प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात उपनगरीय विभागांवर रविवारी विविध अभियांत्रिकी व आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात उपनगरीय विभागांवर रविवारी विविध अभियांत्रिकी व आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. तर हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत ब्लॉक असेल.

मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड स्थानक येथून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.५३ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या/अर्धजलद ट्रेन मुलुंड ते कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील. कल्याण येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.५१ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या/अर्ध जलद ट्रेन कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर दिवसाचा ब्लॉक नाही

ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी शुक्रवार, शनिवारच्या मध्यरात्री वसई रोड यार्डवर सर्व मालगाडी आणि दिवा मार्गांवर जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवार २७ जुलै रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात दिवसभर ब्लॉक राहणार नाही.

मालदीवसोबत संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भारत तयार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

महायुतीत बेबनाव; संजय शिरसाट-माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून जुंपली

हिंजवडी आयटी पार्कचे वाटोळे; आयटी उद्योग बंगळुरू, हैदराबादला चालले; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संताप

शाळांचे सुरक्षा ऑडिट करणे बंधनकारक; केंद्राचे सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सूचनावजा आदेश

अटल सेतूमुळे सरकार मालामाल! आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास