Mumbai : मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक; मुख्य मार्गावर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान ब्लॉक संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक; मुख्य मार्गावर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान ब्लॉक

विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने मुख्य मार्गावर माटुंगा आणि मुलुंडदरम्यान तर ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी स्थानकांदरम्यान रविवारी (ता. १०) मेगाब्लॉक घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने मुख्य मार्गावर माटुंगा आणि मुलुंडदरम्यान तर ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी स्थानकांदरम्यान रविवारी (ता. १०) मेगाब्लॉक घेतला आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात आलेला नाही.

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या माटुंगा व मुलुंड स्थानकांदरम्यान नियोजित थांब्यांनुसार थांबतील व नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

ठाण्यापलीकडील जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्यातून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड व माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या वेळापत्रकानुसार थांबतील,

माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

ट्रान्स-हार्बर मार्गावर अप आणि डाऊन लाइनवरील ठाणे व वाशी, नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत वाशी, नेरूळ आणि ठाणे दरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाइनवरील सेवा रद्द आहेत. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी १६.०७ पर्यंत वाशी, नेरूळ, पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन लाइन सेवा आणि पनवेल, नेरूळ, वाशी येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी १६.०९ पर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप लाइन सेवा रद्द आहेत.

कसारा लोकल आसनगावपर्यंतच धावणार

'ओव्हरहेड इक्विपमेंट' कामातील अडथळा दूर करण्याच्या कामांसाठी मध्य रेल्वेने कसारा (इगतपुरी-खर्डी सेक्शन) येथे १० आणि ११ मे रोजी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. दुपारी ३.५० ते ५.५० या वेळेत दोन दिवस ब्लॉक घेण्यात आल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी १.१०, २.१७आणि २.४६ वाजता सुटणाऱ्या कसारा लोकल आसनगावपर्यंतच चालविण्यात येणार आहेत. तसेच ब्लॉक कालावधीत कसारा येथून सुटणाऱ्या लोकल आसनगाव स्थानकातून चालवण्यात येणार आहेत. इगतपुरी-खर्डी विभागातील अप आणि डाऊन मेन लाइन्सवर रविवार (ता.१०) आणि सोमवारी (ता.११) ब्लॉक घेण्यात आल्याने ब्लॉक कालावधीत या मार्गावर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत

मीरा-भाईंदरमधील २५४ एकर जमीन सरकारीच; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा, जमीन बिल्डरला देण्याच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार

विजय यांच्या सरकारचे समीकरण अखेर जुळले; आज सकाळी होणार शपथविधी

Mumbai : ऑनलाइन फार्मसीमुळे स्थानिक औषध विक्रेते संकटात; २० मे रोजी देशव्यापी संप

Mumbai : कोटीच्या कोटी उड्डाणे; नगरसेवकांवर वाढीव निधीचा वर्षाव, गणेश खणकर यांना सर्वाधिक १५ कोटींचा निधी

रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; तळा तालुक्यात वीज पडून मुलाचा मृत्यू