मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; ठाणे-कल्याण दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक, ट्रान्स-हार्बर मार्गावरही ब्लॉक (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; ठाणे-कल्याण दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक, ट्रान्स-हार्बर मार्गावरही ब्लॉक

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार, २६ जुलै रोजी मुख्य मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार, २६ जुलै रोजी मुख्य मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. ठाणे ते कल्याण दरम्यान आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी व नेरूळ दरम्यान हा ब्लॉक असेल.

ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सकाळी ९.३४ ते दुपारी २.४५ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद अर्ध-जलद गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या नियोजित थांब्याव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवरही थांबतील. सकाळी १०.२८ ते दुपारी ३.४० या वेळेत कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद/अर्ध-जलद गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवरही थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर पुन्हा अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील. तसेच त्या आपल्या गंतव्यस्थानी १० मिनिटे उशिरा पोहोचतील.

  • सीएसएमटी/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल आणि एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५ व्या मार्गिकेवर वळवल्या जातील.

  • सीएसएमटी/दादर येथे येणाऱ्या अप मेल आणि एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान ६ व्या मार्गिकेवर वळवल्या जातील.

  • ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी/नेरूळ दरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाइनवर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

  • ब्लॉकच्या कालावधीत ठाणे आणि वाशी/नेरूळ/पनवेल दरम्यानच्या अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

MBBS पदवीधरांसाठी १ वर्षाचा सेवा बाँड रद्द; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

Mumbai : दोन विशेष जलदगती न्यायालये स्थापन; उच्च न्यायालयाकडून अंमलबजावणी, परीक्षेतील गैरप्रकार रोखणार

Mumbai : कंत्राटदाराचा परवाना स्थगित; महापालिकेकडून कठोर कारवाई

Mumbai : एफडीएने ५ बेकऱ्यांचे परवाने केले रद्द; चार बेकऱ्या बंद

Mumbai : घाटकोपरला उन्नत डेक प्रवाशांच्या सेवेत; गर्दीचे विभाजन होण्यास मिळणार मदत