मुंबई

कोकणात गेलेल्या गणेश भक्तांसाठी मध्य रेल्वे सरसावली; परतीच्या प्रवाशांसाठी १४ विशेष रेल्वे चालवणार

गणेशोत्सवानिमित्त कोकणात गेलेल्या चाकरमान्यांना मध्य आणि कोकण रेल्वेने दिलासा दिला आहे. गणेश भक्तांसाठी खेड ते सीएसएमटी, खेड ते पनवेल या दरम्यान १४ अनारक्षित गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

Swapnil S

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात गेलेल्या चाकरमान्यांना मध्य आणि कोकण रेल्वेने दिलासा दिला आहे. गणेश भक्तांसाठी खेड ते सीएसएमटी, खेड ते पनवेल या दरम्यान १४ अनारक्षित गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

गाडी क्रमांक ०१०७० अनारक्षित विशेष खेड येथून १६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी आणि कळंबणी बुद्रुक येथे थांबे असतील.

गाडी क्रमांक ०१०७१ अनारक्षित विशेष पनवेल येथून १३, १४, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुटेल आणि खेड येथे त्याच दिवशी दुपारी २.४५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०७२ अनारक्षित विशेष १३, १४, १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३.१५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी आणि कळंबणी बुद्रुक येथे थांबे असतील.

गाडी क्रमांक ०१०७३ अनारक्षित विशेष पनवेल येथून १३, १४ आणि १५ सप्टेंबर रोजी रात्री ९.१० वाजता सुटेल आणि खेड येथे दुसऱ्या दिवशी रात्री १ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०७४ अनारक्षित विशेष १३, १४, १५ सप्टेंबर रोजी खेड येथून सकाळी ६ वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी सकाळी १० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी आणि कळंबणी बुद्रुक येथे थांबे देण्यात येतील. या सर्व रेल्वेगाड्या अनारक्षित म्हणून चालणार असून अतिजलद मेल/एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कासह रेल्वेगाडी सुटण्यापूर्वी यूटीएस प्रणालीद्वारे आरक्षित केल्या जाणार आहेत.

देशभरातील सार्वजनिक ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना हटवा; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

लाडकी बहीण योजनेत १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य

Thane : पालिका निवडणुकीची सूत्रे आमदार संजय केळकरांकडे; ठाण्यात शिंदे सेना आणि भाजपमध्ये तणाव वाढणार

बांगलादेशात कांद्याचे भाव शंभरी पार; भारतीय निर्यातदारांकडून आयातबंदी उठवण्याची मागणी

वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ! तिसऱ्या फेरीनंतरही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ३८७ जागा रिक्त