मुंबई

दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांकांमध्ये बदल; १० क्रमांकाचा प्लॅटफॉर्म ९ ए म्हणून ओळखणार

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पूर्वीचा १० क्रमांकाचा प्लॅटफॉर्म बुधवारपासून ९ ए क्रमांक करण्यात आला आहे. तसेच अगोदरचा १० ए क्रमांकाचा फलाट आता १० क्रमांकाचा करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पूर्वीचा १० क्रमांकाचा प्लॅटफॉर्म बुधवारपासून ९ ए क्रमांक करण्यात आला आहे. तसेच अगोदरचा १० ए क्रमांकाचा फलाट आता १० क्रमांकाचा करण्यात आला आहे.

दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १०ची सध्याची लांबी २२ डबे असलेल्या गाड्या हाताळण्यासाठी अपुरी आहे. त्यामुळे ट्रेन मॅनेजर (गार्ड)च्या बाजूने ३ डबे प्लॅटफॉर्मच्या बाहेर राहतात. त्यामुळे गाडी दोन वेळा थांबवावी लागते. प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म क्रमांकामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार प्लॅटफॉर्म क्रमांक १० जेथे पूर्वी मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या दोन्ही थांबत होत्या, त्याचा प्लॅटफॉर्म क्रमांक ९ ए असा बदल करण्यात आला आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली