मुंबई

शिवसेनेकडून छत्रपती संभाजीराजे हे पुरस्कृत सहावे उमेदवार ?

प्रतिनिधी

राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहत असून सहा जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून छत्रपती संभाजीराजे हे पुरस्कृत सहावे उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू होती. शिवसेनेनेही तास प्रस्ताव दिला होता; मात्र या प्रस्तावावर संभाजीराजे यांनी कोणतीच प्रतिक्रीया न दिल्याने निर्माण झालेला पेच आता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. संभाजीराजे हेच सर्व सहमतीने शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून राज्यसभेवर जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सोमवारी पुन्हा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात मातोश्री येथे या विषयावर चर्चा होऊन अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

संभाजीराजे यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. संभाजीराजे यांचा मुक्काम सध्या मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये असून तेथे शिवसेनेचे नेते अनिल देसाई, उदय सामंत आणि मिलिंद नार्वेकर या तीन नेत्यांच्या शिष्टमंडळाने संभाजीराजे यांची भेट घेतली. यात संभाजीराजे हे शिवसेनापुरस्कृत सहावे उमेदवार राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यसभेवर निवडून जायचे असेल तर संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा; अन्यथा आम्ही सहाव्या जागेवर आमचा उमेदवार रिंगणात उतरवू, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती; मात्र संभाजीराजे यांनी,‘मला शिवसेना नको तर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित करा,’ अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. ही मागणी अखेर उद्धव ठाकरे यांनी काही अंशी मान्य केल्याचे समजते; मात्र याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. याच फॉर्म्युल्यावर शिवसेना आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात समझोता झाल्याचे समजते. याबाबत संभाजीराजे लवकरच घोषणा करणार आहेत.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल