मुंबई

तोरणा बंगल्यात पोलिसांच्या सुविधांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

प्रतिनिधी

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थाना शेजारी असलेल्या तोरणा बंगल्याचे नूतनीकरण करताना सुरक्षेसाठी तैनात पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांसाठी विविध सोयी सुविधांची निर्मिती करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले.

वर्षा शासकीय निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डावखर यांच्यासह तोरणा बंगल्याची पाहणी केली.

दर्जेदार सुविधा पुरवण्याचे निर्देश

वर्षा आणि तोरणा या शासकीय निवासस्थानी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना दर्जेदार सुविधा पुरविण्यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष पुरविले असून यापूर्वीच अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी अभ्यास कक्ष, दुमजली बेड , (बंक बेड), वातानुकूलित यंत्रे ध्यानधारणेसाठी कक्ष अशा सुविधांचे काम तात्काळ हाती घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. पिण्याचे पाणी स्वच्छतागृहे आणि इतर सुविधा लवकरात लवकर पुरविण्याचे निर्देश देतानाच हे काम रेंगाळणार नाही याची दक्षता घेण्याच्याही सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?