Freepik
मुंबई

अल्पवयीन मुलाला सिगारेटचे चटके

दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला सिगारेटचा चटका दिल्याप्रकरणी फहाद मोहसीन खानविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Swapnil S

मुंबई : दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला सिगारेटचा चटका दिल्याप्रकरणी फहाद मोहसीन खानविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फहादने मुलाला चटका दिल्यानंतर जाब विचारणाऱ्या मुलाच्या आईला शिवीगाळ करून मारहाण केली होती. तक्रारदार त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत घाटकोपर परिसरात राहतात. त्यांचा एक मुलगा दहा वर्षांचा असून त्याच परिसरात असलेल्या शाळेत शिकतो. शनिवारी रात्री आठ वाजता त्यांचा मुलगा सुविधा सेंटरजवळील जुम्मा खान चाळ, यूपी रेस्टाॅरंटसमोर उभा होता. यावेळी रिक्षात बसलेल्या त्याचा परिचित फहादने त्याला बोलाविले होते. यावेळी काहीही कारण न नसताना फहादने त्याच्या हाताला सिगारेटचा चटका दिला होता. घरी आल्यानंतर त्याने हा प्रकार त्याच्या आईला सांगितला. या माहितीनंतर तिने फहादला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता फहादने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर फहाद तेथून पळून गेला. पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांनी फहाद शेखविरुद्ध तक्रार केली होती.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण