एकनाथ शिंदे सग्रहित छायाचित्र
मुंबई

रस्त्यांचे काँक्रीटीकरण ३१ मेपऱ्यंत पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश, लहान रस्ते अस्फॉल्टमध्ये करण्याच्या सूचना

मुंबईत सुरु असलेली रस्त्यांची सर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश यापूर्वीच मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईत सुरु असलेली रस्त्यांची सर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश यापूर्वीच मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. १५ मीटरपेक्षा कमी असणारे, लहान रस्ते सिमेंट क्राँक्रीटीकरण न करता अस्फॉल्टमध्ये त्यांची कामे करावीत, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी प्रशासनाला सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत केली.

मुंबईतील सिमेंट काँक्रीटच्या रस्तेकामांत सहा हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा प्रकार दोन वर्षांपूर्वी उघडकीस आणला होता. मात्र आज पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी सिमेंट काँक्रीटच्या रस्ते कामाची गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात सोमवारी सायंकाळी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसंदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सर्वपक्षीय आमदार उपस्थित होते.

मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरणामुळे सर्वच रस्ते खोदून ठेवण्यात आले आहे. मोजक्या पाच कंत्राटदारांना सर्व कंत्राटे देण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांच्या आणि कंत्राटदारांचे गौडबंगाल काय आहे. किती अधिकाऱ्यांचे नातेवाईक सब कंत्राटदार आहेत, असे एक ना अनेक प्रश्न शुक्रवारी मुंबईतील रस्त्यांवरुन विधानसभेत विचारण्यात आले. मुंबईतील खड्डेमय रस्त्यांवरून आमदारांनी नगरविकास खात्याला धारेवर धरले होते. स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या मतदारसंघातील रस्त्याच्या समस्या सांगितल्या. त्यानंतर नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबईतील सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे ठरवण्यात आले. ही बैठक सोमवारी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झाली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमनेसामने आले. यावेळी शिंदेंनी आदित्य ठाकरेंकडे पाहणे टाळले.

यावेळी नगरविकास तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्तेकामाचा अहवाल सादर केला. यात त्यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यातील २३ टक्के कामे झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील ०.५ टक्के काम झाले आहे.

सोमवारी पक्षफुटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे प्रथमच आमनेसामने आले. शिंदे विधानसभाध्यक्षांच्या दालनात बैठकीसाठी येताच बैठकीला उपस्थित सगळे उठून उभे राहिले. मात्र आदित्य ठाकरे खुर्चीतच बसून राहिले. त्यामुळे भविष्यात ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष वाढणार याचे संकेत मिळाले.

यावेळी मुंबईतील सर्वपक्षीय आमदार रस्त्यांच्या कामाबद्दल आणि दर्जाबद्दल आक्रमक झाले होते.

BMC Election : आज मतदान; मुंबईच केंद्रस्थानी; बोटावर उमटणार लोकशाहीचा ठसा, तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण

Thane Election : व्होटर स्लिपमध्ये घोळ; नाव, अनुक्रमांक बरोबर; पत्ते मात्र बदलले

BMC Elections 2026: मुंबईत मतदानाला झाली सुरूवात; आज काय सुरू, काय बंद?

मतदार आज 'राजा'; मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणूक; साडेतीन कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क

अजित पवारांनी फोडला सिंचन घोटाळ्याचा 'बॉम्ब'; मतदानाआधीच मित्रपक्षांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे खळबळ