राहुल नार्वेकर संग्रहित छायाचित्र
मुंबई

मनोरा आमदार निवासाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करा; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश

मुंबईतील मनोरा आमदार निवासी इमारतीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पार्किंगसह सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील मनोरा आमदार निवासी इमारतीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पार्किंगसह सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. या निवासी इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर असून २०२७ पर्यंत बांधकाम पूर्ण करा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. राहुल नार्वेकर यांनी उच्चाधिकार समितीची बैठक शुक्रवारी पार पडली.

मुंबई येथील मनोरा आमदार निवास प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मनोरा आमदार निवासाच्या बांधकाम आराखड्यात बदल करण्यात येत आहे. त्यामुळे हरित पट्टा, वाहनतळ, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यासारख्या सुविधांचे ठिकाण आणि क्षेत्र यामध्ये बदल झाला आहे. कामाच्या स्वरूपात झालेला बदल आणि त्याच्या वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली. ठरलेल्या वेळेच्या आता सर्व काम पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देशही नार्वेकर यांनी दिले.

बैठकीस विधानपरिषद सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपूते, लार्सन अँड टुब्रो कंपनीचे अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी लार्सन अँड टुब्रो कंपनीतर्फे सादरीकरण करण्यात आले.

Iran vs US-Israel War : डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; "४८ तासांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, नाहीतर....

१ एप्रिलपासून ATM नियमांत बदल! UPI व्यवहारही मोजले जाणार, फ्री लिमिटनंतर २३ रुपये शुल्क

Mumbai : किरकोळ रिक्षा रांगेतील वादातून मुलींवर जमावाचा हल्ला; मालाडमध्ये ५ जण अटकेत

Iran vs US-Israel War : रडारपासूनही अदृश्य राहणारे अमेरिकेचे एफ-३५ जेट फायटर इराणने उडविले

World Water Day 2026 : मुंबईकरांना लाखो लिटर पाणी लागणार; १५ वर्षात आणखी ३ हजार दशलक्ष लिटर पाण्याची गरज