मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या पेट परीक्षेत गोंधळ

मुंबई विद्यापीठातर्फे आज आयोजित करण्यात येत पी.एच.डी. प्रवेश पूर्व परीक्षेत (पेट) गोंधळ झाला. अनेक परीक्षा केंद्रांवर परीक्षा १०.३० वाजता सुरू होणे अपेक्षित असताना ती १२ वाजेनंतरही सुरू न झाल्याने विद्यार्थी संतप्त झाले.

Swapnil S

मुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे आज आयोजित करण्यात येत पी.एच.डी. प्रवेश पूर्व परीक्षेत (पेट) गोंधळ झाला. अनेक परीक्षा केंद्रांवर परीक्षा १०.३० वाजता सुरू होणे अपेक्षित असताना ती १२ वाजेनंतरही सुरू न झाल्याने विद्यार्थी संतप्त झाले. या प्रकारामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकले असण्याची शक्यता युवा सेनेने व्यक्त केली. तसेच या गोंधळाची चौकशी करून संबंधित संस्थेवर दंडात्मक कारवाई करावी आणि परीक्षेची नैतिक जबाबदारी स्वीकारून परीक्षा नियंत्रकांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी युवा सेनेने केली आहे.

विद्यापीठाने रविवारी पेट आणि एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेचे आयोजन केले होते. तब्बल दोन वर्षांनी होणारी पेट परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर एक तास अगोदर पोहचले. मात्र कांदिवली येथील ठाकुर कॉलेल व डोंबिवली येथील सुरेखा इन्फोटेक येथे परीक्षा नियोजित वेळी सुरू होऊ शकली नाही.

परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना परिक्षेबाबत माहिती देण्यात येत नसल्याने विद्यार्थी संतप्त झाले. त्यामुळे आज परीक्षा न झालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहेत.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता