मंत्री दादा भुसे 
मुंबई

काँग्रेसकडून दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी; ७ दिवसांत राजीनामा न दिल्यास घराबाहेर आंदोलन

पेपरफुटी, मराठी शाळा बंद पडणे आणि विद्यार्थ्यांना भेडसवणाऱ्या विविध प्रश्नांवर काँग्रेसप्रणित नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया आणि युवक काँग्रेसने आंदोलन पुकारले असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची नैतिक जबाबदारी स्वीकारून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Swapnil S

मुंबई : पेपरफुटी, मराठी शाळा बंद पडणे आणि विद्यार्थ्यांना भेडसवणाऱ्या विविध प्रश्नांवर काँग्रेसप्रणित नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया आणि युवक काँग्रेसने आंदोलन पुकारले असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची नैतिक जबाबदारी स्वीकारून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सात दिवसांत राजीनामा न दिल्यास शिक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दादर येथील टिळक भवन या प्रदेश मुख्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे आणि युवक काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा झीनत शबरीन यांनी ही मागणी केली. एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यभरातील लाखो विद्यार्थी, पालक आणि युवकांशी संवाद साधून शिक्षण मंत्री भुसे यांची एक विशेष ‘गुणपत्रिका’ तयार केली आहे. या गुणपत्रिकेच्या माध्यमातून त्यांनी मंत्र्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन केले असून, त्यात पेपरफुटी, शालार्थ आयडी घोटाळा आणि बंद होत असलेल्या मराठी शाळा यांसारख्या विषयांचा समावेश आहे. ज्याप्रमाणे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना नैतिक जबाबदारी स्वीकारावी लागली, तशीच जबाबदारी स्वीकारून भुसेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली