PTI
मुंबई

मविआच्या प्रचाराचा धडाका आजपासून! राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचा मेळावा, मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, उद्धव ठाकरेंची उपस्थिती

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजयाची माळ मविआच्या गळ्यात पडली पाहिजे या तयारीनिशी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रणनीती आखली आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये आज (मंगळवारी) दुपारी ३ वाजता महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचा मेळावा आयोजित केला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त षण्मुखानंद हॉलमध्ये काँग्रेसच्या मेळाव्यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उपस्थित असणार आहेत.

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मविआचा प्रचाराचा धुमधडाका आजपासून सुरू होणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शरद पवार या मेळाव्यात कोणाचा समाचार घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

१६ ऑगस्ट रोजी षण्मुखानंद हॉलमध्ये मविआचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, नसीम खान आदींनी राज्यातील सत्ताधारी महायुतीवर हल्लाबोल केला होता. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत जनतेने कौल दिला तरी विधानसभा निवडणुकीत गाफील राहू नका, असा सल्ला मविआच्या नेत्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पराजयाची धूळ चारण्यासाठी मविआच्या नेत्यांनी चंगच बांधला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या मेळाव्यात मविआचे नेते कोणाला लक्ष्य करणार याची उत्सुकता लागली आहे.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत