BMC निवडणुकीसाठी काँग्रेस-वंचितचं ठरलं! दोन्ही पक्षांची युती जाहीर, जागावाटपही निश्चित 
मुंबई

BMC निवडणुकीसाठी काँग्रेस-वंचितचं ठरलं! दोन्ही पक्षांची युती जाहीर, जागावाटपही निश्चित

मुंबई महापालिका निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली असून काँग्रेस-वंचितने युती जाहीर केली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. बहुचर्चित ठाकरे बंधूंच्या युतीनंतर आता राज्यातील महत्त्वाच्या पक्षांनी त्यांची युती जाहीर.केली आहे काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांनी त्यांची युती आगामी निवडणुकांसाठी जाहीर केली आहे. रविवारी (दि.२८) काँग्रेसने ही अधिकृत घोषणा केली.

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका, त्यात BMC चा समावेश असून, या सर्व निवडणुका एकाच टप्प्यात १५ जानेवारीला होणार आहेत. तर मतमोजणी १६ जानेवारीला होणार आहे.

वंचित बहुजन आघाडीला किती जागा?

युतीअंतर्गत जागावाटप निश्चित करण्यात आले असून, मुंबईतील एकूण २२७ जागांपैकी वंचित बहुजन आघाडी ६२ जागांवर उमेदवार देणार आहे. उर्वरित जागांवर काँग्रेस उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे .

नोव्हेंबरमध्ये काँग्रेसने एकट्याने लढण्याची केली होती घोषणा

याआधी नोव्हेंबर महिन्यात काँग्रेसने BMC निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती. मात्र समान विचारसरणीच्या पक्षांशी युतीची शक्यता खुली ठेवण्यात आली होती. ठाकरे बंधू, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले होते.

पीटीआयच्या वृत्तानुसार, काँग्रेसमधील एका गटाने राज ठाकरे यांच्याशी युतीला विरोध केला होता. उत्तर भारतीय स्थलांतरितांविरोधातील त्यांच्या भूमिकेमुळे हा विरोध असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

BMC निवडणुकीचे वेळापत्रक

बृहन्मुंबई महानगरपालिकेत एकूण २२७ जागा असून, एकूण मतदारसंख्या १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ इतकी आहे. यामध्ये ५५,१६,७०७ पुरुष मतदार, ४८,२६,५०९ महिला मतदार आणि १,०९९ इतर प्रवर्गातील मतदारांचा समावेश आहे. पुरुष मतदारांचे प्रमाण ५३ टक्के असून, महिलांचे प्रमाण ४७ टक्के आहे.

नामनिर्देशन प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली असून, ३० डिसेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. २ जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून, ३ जानेवारीला अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.

Mumbai : १० कोटींच्या खंडणी प्रकरणात मोठा खुलासा; २ महिलांना पोलीस कोठडी, मराठी अभिनेत्रीचाही सहभाग

"धमकीची माहिती देऊनही..." ; खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्याप्रकरणी नातेवाईकांचा गंभीर आरोप

खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्येचा थरार; धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

'पटक पटक के मारुंगा…' एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टला जाणाऱ्या प्रवासी महिलेला ऑटोचालकाकडून धमकी; Video व्हायरल

पुण्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी; निवडणुकीच्या युती-आघाड्यांची नव्याने मांडणी