पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल!

नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ

 
मुंबई

पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल! नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ

वृत्तसंस्था

पाचपैकी चार राज्यांतील निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सरकार लवकरच पडणार असल्याचे भाकित केले जात आहे. शिवाय, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे भाजपकडून बाहेर काढले जात आहेत. असे असताना आता नाना पटोले यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा काँग्रेस मिळवणार आणि पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल, असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नाना पटोले यांनी ट्विटद्वारे हा दावा केला आहे. या अगोदरदेखील अनेकदा नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा केल्याने विविध चर्चा रंगल्या होत्या. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असला तरीदेखील स्थानिक निवडणुकात काँग्रेसने स्वबळावरच लढण्याचा निर्णय घेतलेला आहे.

दरम्यान, केंद्रात सत्तेचा दुरुपयोग करून भाजपने ब्लॅकमेलिंगचे राजकारण चालविले आहे. काँग्रेससह सर्व विरोधकांना नामोहरम करण्यासाठी त्यांच्यामागे ईडी, सीबीआयची चौकशी लावायची आणि विरोधकांना जेरीला आणायचे, हीच मोदी सरकारची सूडभावनेची कार्यसंस्कृती राहिली आहे. जे विरोधक शरण येणार नाहीत, त्यांच्यामागे चौकशीचा ससेमीरा लावायचा आणि तरीही विरोधक शरण येत नसतील तर त्यांच्या ताब्यातील राज्य सरकार पाडण्याचे कट कारस्थान रचण्यात येते, असे नाना पटोले यांनी काल सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले.

Mumbai : सुरसम्राज्ञी आशा भोसले पंचतत्त्वात विलीन; शिवाजी पार्कमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Mumbai : नॉन-एसी लोकलमध्ये आता ऑटोमॅटिक दरवाजे; कुर्ला कारशेडमध्ये नव्या EMU रेकचे आगमन, पाहा VIDEO

Mumbai : 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली ६० लाखांची फसवणूक; महिलेला मालमत्ता विकायलाही भाग पाडले

Mumbai : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दादरमध्ये ट्रॅफिक निर्बंध; कोणते रस्ते बंद? जाणून घ्या सविस्तर

Thane : कल्याण-मुरबाड मार्गावर भीषण अपघात; इको व्हॅन-सिमेंट मिक्सर धडकेत ११ जणांचा मृत्यू, वाहनाचा चक्काचूर