मुंबई

नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला (जेएनपीटी) जोडण्यासाठी पूरक रस्त्यांची निर्मिती करणार

प्रतिनिधी

नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला (जेएनपीटी) जोडण्यासाठी पूरक रस्त्यांची निर्मिती करण्यावर भर देण्यात येत असून त्यावर सुमारे ३,५०० कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जेएनपीटीअंतर्गत भागांना जोडणारे अनेक नवीन रस्ते जोडणी प्रकल्प हाती घेतले आहेत. सुमारे ३,५०० कोटी रुपये खर्चाने राष्ट्रीय महामार्ग-४ब (नवीन एनएच-३४८, ५४८) आणि राज्य महामार्ग-५४ (नवीन एनएच-३४८अ ) या मार्गांची पुनर्बांधणी आणि सुधारणा करण्याचे काम हाती घेतले आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

या प्रकल्पांची पूर्तता झाल्यानंतर प्रवासाचा वेळ आणि वाहनांवरचा खर्च कमी होईल. शिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह निर्यात आणि दळणवळण यामुळे या क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. करळ फाटा आणि गव्हाण फाटा येथील दोन ग्रेड सेपरेटरमुळे वाहनधारकांना जलदरीत्या लेन बदलणे आणि राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर येणे सुलभ होणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे

Maharastra Rain: मुसळधार पावसाची शक्यता; ऑरेंज अलर्ट जारी

शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा

लडाख आंदोलनाला हिंसक वळण; भाजपचा कॉँग्रेसवर कटाचा आरोप

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून

मुंब्रा-कळवा भागात पाणीटंचाई; पाणीटंचाईबाबत महापालिका मुख्यालयावर धडक; जितेंद्र आव्हाडांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब