मुंबई

कूपर रुग्णालयात 'फायर सेफ्टी बॉल' बसवणार; आग प्रतिबंधक तयारी अधिक मजबूत होणार

हे स्वयंचलित अग्निशमन बॉल ठराविक तापमान गाठल्यानंतर फुटतात आणि त्यातून रासायनिक पावडर बाहेर पडते, जी ज्वाळा पसरू न देता आग नियंत्रणात आणते.

अमित श्रीवास्तव

मुंबई : आगीला वेळीच आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने सक्रिय पाऊल उचलले आहे. जुहूच्या कूपर रुग्णालयात लवकरच 'फायर सेफ्टी बॉल' बसवले जाणार आहेत. हे उपकरण बसवायला महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. हे बॉल विशेषतः अशा ठिकाणी उपयुक्त ठरणार आहेत, जिथे कर्मचारी उपस्थित नसतात आणि अचानक आग लागल्यास तात्काळ प्रतिसाद देणे कठीण होते.

हे स्वयंचलित अग्निशमन बॉल ठराविक तापमान गाठल्यानंतर फुटतात आणि त्यातून रासायनिक पावडर बाहेर पडते, जी ज्वाळा पसरू न देता आग नियंत्रणात आणते.

अलीकडेच दिवाळीच्या काळात मुंबईत घडलेल्या आगीच्या दुर्घटनांनंतर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

जुहू-विलेपार्ले परिसरातील कूपर रुग्णालय दररोज अंदाजे २ हजार रुग्ण येतात. अंधेरी, सांताक्रूझ, खार, बांद्रा, जोगेश्वरी आणि मालाडसह पश्चिम उपनगरातील नागरिक येथे उपचारासाठी येतात. तसेच हे रुग्णालय देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गाच्या जवळ असल्याने आपत्कालीन अपघातग्रस्त प्रकरणांसाठीही महत्त्वाचे केंद्र आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, असे फायर सेफ्टी बॉल आधीच पालिकेच्या मुख्यालयात बसवले आहेत. तत्कालीन मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांच्या कार्यकाळात ही प्रणाली लागू करण्यात आली होती आणि ती प्रभावी ठरली आहे.

दररोज शेकडो रुग्ण रुग्णालयात येत असल्याने हे उपकरण तातडीच्या प्रतिसादासाठी उपयुक्त ठरणार आहे. आग लागल्यास हे बॉल आपोआप फुटतात किंवा अग्निशमन कर्मचारी ते हातानेही ज्वाळांच्या दिशेने फेकू शकतात. त्यामुळे काही सेकंदांत रासायनिक पावडर पसरून आग आटोक्यात येते.

महापालिकेने सर्व निवासी, व्यावसायिक इमारती, कार्यालये, मॉल्स, कारखाने आणि दुकाने यांमध्येही मान्यताप्राप्त अग्निशमन प्रणाली बसवण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून आग लागल्यास जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान टाळता येईल. गेल्या काही दिवसात मुंबईत आगीच्या घटनांची संख्या वाढत आहे.

डॉक्टर आत्महत्या प्रकरण : रणजीतसिंह निंबाळकरांवर विरोधकांचा आरोप; मात्र, मुख्यमंत्री फडणवीसांचा पाठिंबा, म्हणाले, "चिंता करू नका...

पाकिस्तानात सलमान खान 'दहशतवादी' घोषित; एका विधानाने 'भाईजान' ठरला अतिरेकी

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; निलंबित PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण

झारखंड : रुग्णालयाचा निष्काळजीपणा? थॅलेसेमियाग्रस्त ५ मुलांना HIV ची लागण; दूषित रक्त चढवल्याचा धक्कादायक आरोप

Karad : खड्ड्यांमध्ये बसून यमाच्या प्रतिमेचे पूजन; रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन