कूपरमध्ये बेडवरून रुग्ण पडण्याच्या घटनांत वाढ; नातेवाईकांकडून सुरक्षेची मागणी संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : 'कूपर'मध्ये बेडवरून रुग्ण पडण्याच्या घटनांत वाढ; नातेवाईकांकडून सुरक्षेची मागणी

विलेपार्ले (पश्चिम) येथील कूपर रुग्णालयात बेडवरून पुन्हा एकदा रुग्ण पडल्याची घटना घडली असून, रुग्ण सुरक्षेविषयी नव्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत. उच्च रक्तदाब आणि फिट्सच्या उपचारासाठी भरती असलेल्या ७५ वर्षीय महिलेचा सोमवारी रात्री बेडवरून पडून अपघात झाला.

Swapnil S

मुंबई : विलेपार्ले (पश्चिम) येथील कूपर रुग्णालयात बेडवरून पुन्हा एकदा रुग्ण पडल्याची घटना घडली असून, रुग्ण सुरक्षेविषयी नव्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत. उच्च रक्तदाब आणि फिट्सच्या उपचारासाठी भरती असलेल्या ७५ वर्षीय महिलेचा सोमवारी रात्री बेडवरून पडून अपघात झाला. घटनेच्या वेळी त्या आपल्या मुलीसह महिला वॉर्डमध्ये होत्या. दरम्यान, दरम्यान, महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांच्या संचालक व कूपर रुग्णालयाच्या कार्यवाह डीन डॉ. नीलम आंद्राडे यांनी आवश्यक असल्यास बेडला साइड रेल्स बसवण्याचेही आश्वासन दिले.

गेल्या पंधरवड्यात अशी ही तिसरी घटना आहे. २४ नोव्हेंबरला ८० वर्षीय सोनाबाई चव्हाण या हृदयविकाराच्या उपचारासाठी भरती असताना बेडवरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. झीनतबी रसूल अहमद शेख या ३० नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्या कुटुंबीयांच्या मते, त्यांची दृष्टी जवळपास पूर्णपणे बिघडलेली होती- एका डोळ्याचे नुकतेच ऑपरेशन झाले होते आणि दुसऱ्या डोळ्याची दृष्टी अत्यल्प होती. त्यांचे जावई मोहम्मद जावेद सिद्दीकी यांनी सांगितले की दोन महिला नातेवाईक आलटून-पालटून त्यांची काळजी घेत होत्या. सोमवारी त्या थंडी वाजत असल्याचे सांगून पंखा बंद करण्यास म्हणाल्या. मुलगी पंखा बंद करण्यास गेली, तेव्हाच त्या खाली पडल्या, असे सिद्दीकी यांनी सांगितले. त्यांच्या डोक्याला मार बसला असला तरी तो गंभीर नव्हता. सुदैवाने यावेळी मोठी दुखापत झाली नाही.

तीन महिन्यांमध्ये २६ घटना

रुग्णालयातील निष्काळजीपणाच्या तक्रारी नव्या नाहीत. आरोग्य कार्यकर्ते तुषार भोसले यांनी सांगितले की गेल्या तीन महिन्यांत जूहू पोलीस ठाण्यात २६ मेडिको-लीगल प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जुलै ते सप्टेंबर २०२५ दरम्यानच २६ रुग्ण पडण्याच्या घटना ‌व उंदर चावण्याच्या सहा घटना नोंदल्या गेल्या होत्या. त्यानंतर पालिका प्रशासनाने काही दुरुस्तीची पावले उचलली होती.

बेडला साइड रेल्स बसवा

या घटनांच्या पार्श्वभूमीवर, नातेवाईकांनी बेडला साइड रेल्स बसवण्याची मागणी पुन्हा जोरदार केली आहे. “रुग्णांच्या शेजारी नातेवाईक किंवा कर्मचारी सतत बसू शकत नाहीत. बेड रेल्स असतील तर अशा घटना टाळता येऊ शकतात,” असे एका नातेवाईकाने सांगितले. सलग घडणाऱ्या अपघातांमुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांमध्ये दहशत निर्माण झाली असून रुग्णांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुंबईत PM मोदी आणि मॅक्रॉन यांची गळाभेट; 'भारत-फ्रान्स इनोव्हेशन ईयर'चे करणार उद्घाटन, दिल्लीत AI समिटमध्येही होणार सहभागी

"तो आमचं सर्वस्व होता": एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर दाम्पत्याची आत्महत्या; ४ पानी सुसाईड नोटसह Video मेसेज व्हायरल

Mumbai : स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी; चार नावे चर्चेत

लोकलच्या गर्दीतून दिलासा,१२ वीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर जाग! KDMC-TMCचा निर्णय, ठाणे-डोंबिवली-कल्याण बससेवा होणार सुरु

ठाणे सामूहिक अत्याचार प्रकरण : पुण्यातून २२ वर्षीय आरोपीला अटक, वर्षभरापासून होता फरार