मुंबई

कूपर रुग्णालय : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेला अंधत्व, जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

भुलचे इंजेक्शन ऐवजी चुकीचे इंजेक्शन दिल्याचा आरोप रामीला यांचा मुलगा महेश यांनी केला आहे

प्रतिनिधी

५८ वर्षीय महिला डोळ्यांचे मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी पालिकेच्या डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात ३१ मे रोजी दाखल झाले आणि १ जून रोजी मोतिबिंदूची शस्त्रक्रिया झाली. मात्र काही वेळेनंतर डोळे दुखण्यास सुरुवात झाल्याने डोळ्याची पट्टी उघडलं तर काहीच दिसत नव्हते, असे रामीला यांनी सांगितले.

दरम्यान, महिलेच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तंज्ञ डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली आहे. तसेच इंजेक्शन चुकीचे दिले हा आरोप बिनबुडाचा आहे, असे कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले. रामीला या ५८ वर्षीय महिलेवर डोळ्यांची शस्त्रक्रिया शिकाऊ डॉक्टरांनी केली असून भुलचे इंजेक्शन ऐवजी चुकीचे इंजेक्शन दिल्याचा आरोप रामीला यांचा मुलगा महेश यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे सचिव भिमेश मुतुला यांनी मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंग चहल व कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे आणि जुहू पोलीस ठाणे वरिष्ठ निरीक्षक यांना माहिती देत कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश व नेत्ररोग्यशास्त्र विभागाविरुद्ध वैद्यकीय निष्काळजीपणा कायदा अधिनियम अनुसार चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे मागणी केली आहे.

मतदारच डिलीट केले! राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर आरोप

मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; आठवड्याभरात दुसरी घटना, पोलिसांकडून अलर्ट जारी

मालेगाव बॉम्बस्फोटातील निर्दोष सुटलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस

मराठा समाजाला मोठा दिलासा! हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली

...म्हणून मला मोदींना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! पंच्याहत्तरीनंतरही सक्रिय असलेल्या शरद पवारांचे वक्तव्य