संग्रहित छायाचित्र 
मुंबई

तपासातील विसंगतीवर न्यायालयाचे बोट; सत्र न्यायालयाच्या निर्णयाचा पोलिसांना दणका

सात वर्षापूर्वी झालेल्या पत्नीच्या हत्याप्रकरणी सत्र न्यायालयाने ३३ वर्षाच्या पतीला दिलासा दिला.

Swapnil S

मुंबई : सात वर्षापूर्वी झालेल्या पत्नीच्या हत्याप्रकरणी सत्र न्यायालयाने ३३ वर्षाच्या पतीला दिलासा दिला. न्यायालयाने एफआयआर दाखल करण्यास विलंब होण्यापासून ते प्रक्रियात्मक अन्य विसंगती आहेत. तसेच तपास आणि खटल्यातील विविध त्रुटीं बोट ठेवत आरोपीची निर्दोष सुटका केली.हत्या झालेल्या महिलेच्या आईने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, २१ एप्रिल २०१८ रोजी मध्यरात्री आरोपी बिलाल शेख दारू पिऊन घरी आला. त्यावेळी त्याच्या पत्नीने आई आजारी असल्याने लाईट सुरू करू नका, असे सांगितले. त्यामुळे बिलाल संतापला आणि त्याने तिची हत्या केली, असा आरोप आईने केला. बिलालने सतत मारहाण करून घराबाहेर ओढत नेले. बाहेर नेल्यानंतरही तो मारहाण करत होता. या दरम्यान पहाटे ती बेशुद्ध झाली. नंतर तिला रुग्णालयात नेले. मात्र तिथे उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, असे आईने एफआयआरमध्ये नमूद केले. खटल्यात आरोपीच्यावतीने मुमन शेख यांनी तक्रार आणि पोलीसांच्या तपासावरच आक्षेप घेतला. घटना घडल्यानंतर १८ तासानंतर एफआयआर दाखल करण्यात आला.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल