FPJ
मुंबई

लग्नाचे वचन मोडणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे! सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

प्रेमसंबंधात लग्न करण्याचे दिलेले वचन कालांतराने मोडणे हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा देत सत्र न्यायालयाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

Swapnil S

मुंबई : प्रेमसंबंधात लग्न करण्याचे दिलेले वचन कालांतराने मोडणे हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा देत सत्र न्यायालयाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला. अनेकदा प्रेमसंबंध असलेल्या महिलेच्या आत्महत्या प्रकरणात लग्नाचे वचन मोडून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला जातो. मात्र हा आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक हेतूच नसतो, असे सत्र न्यायालयाचे न्या. सत्यनारायण आर. नवंदर यांनी जामीन देताना स्पष्ट केले.

आत्महत्या केलेल्या महिलेची आरोपी तरुणाशी ओळख झाली होती. त्यांच्यात प्रेमभावना निर्माण झाली. त्यांनी शारीरिक संबंध ठेवले होते. तरुणाने महिलेला तिच्याशी लग्न करण्याचे वचनही दिले होते. तरुणाचे इतर महिलांशीही संबंध असल्याचे आत्महत्या केलेल्या महिलेला कळले. यातून वादावादी झाल्यानंतर तरुण हा महिलेशी बोलणे टाळू लागला.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता