मुंबई

गुन्हेगार तरुणाची त्याच्या वाढदिवशीच हत्या

आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली

प्रतिनिधी

मुलुंड येथे निलेश सुरेश साळवे या ३० वर्षांच्या गुन्हेगार तरुणाची त्याच्या वाढदिवशी सहा जणांच्या एका टोळीने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केली. याप्रकरणी जावेद शेख, चेतन शिरसाट, इरप्पा धनगर, निलेश बाटलीवाला, प्रल्हाद मच्छालू आणि भावेश बोर्डे अशी या सहा जणांविरुद्ध मुलुंड पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. याच गुन्ह्यांत भावेश, जावेदसह अन्य एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. इतर आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

गोशाला रोडवर तसेच आसपासच्या परिसरातील झोपडपट्टीत रूम बांधण्याचे सिव्हिल काम घेण्याच्या वादातून ही हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री ३ वाजता मुलुंड येथील गोशाला क्रॉस रोड, चक्कीवाली गल्लीतील न्यू ऐश्‍वर्या इमारतीच्या गेटसमोर घडली. गौरी ही तिचा पती निलेश आणि १८ महिन्यांच्या मुलासोबत गोशाला रोडवरील हनुमान मंदिर गल्लीत राहत असून, ती नर्स म्हणून कामाला आहे. तिचा पती तेथील झोपडपट्टीत रूम बांधण्याचे सिव्हिल काम करीत होता. त्याच्याविरुद्ध हत्येच्या एका गुन्ह्यांची नोंद असून याच गुन्ह्यांतून त्याची २०१८ साली निर्दोष सुटका झाली होती.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता