मुंबई

बंडखोर आमदारांच्या सुरक्षिततेसाठी सीआरपीएफचे जवान तैनात

शिवसेनेतील बंडखोर आमदारांमुळे राज्यातील परिस्थिती अस्थिर झाली आहे.

प्रतिनिधी

बहुमत चाचणीसाठी शिवसेनेचे बंडखोर आमदार गुरुवारी मुंबईत दाखल होणार असून त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान तैनात करण्यात येणार आहेत. सुमारे दोन हजार सीआरपीएफचे जवान आमदारांच्या सुरक्षेसाठी असतील, अशी माहिती आहे.

शिवसेनेतील बंडखोर आमदारांमुळे राज्यातील परिस्थिती अस्थिर झाली आहे. मुंबईसह राज्यातील आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह गुवाहाटी येथून मुंबईत दाखल होणार आहेत. बंडखोर आमदार मुंबईत आल्यानंतर त्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचा वापर करण्यात येणार असल्याचे समजते. याशिवाय राज्य पोलिसांनाही त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात राहण्यास सांगण्यात आले आहे. राज्यातील अनेक नेत्यांच्या मागे सध्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीचा ससेमिरा लागला आहे. मंत्री आणि नेत्यांची चौकशी, अटक यासाठीही केंद्रीय राखीव पोलीस दलाचा वापर करण्यात येतो. अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या कारवाया, आयकर विभागाच्या कारवायांदरम्यानही केंद्रीय राखीव पोलिसांची मदत घेण्यात येते. त्यामुळे सद्यस्थितीत राज्याच्या पोलिसांना दूर ठेवून केंद्रीय यंत्रणांची मदत घेण्यात येऊ शकते, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश