मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ च्या पुनर्विकास कामांसाठी मध्य रेल्वेने १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर दरम्यान ७५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्लॉकमुळे सीएसएमटीपर्यंत येणाऱ्या ८ महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम होणार असून त्यांना दादर व ठाणे स्थानकातच मुक्कामी थांबवले जाईल.
आरएलडीएद्वारे काम सुरू
हा ब्लॉक सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्म १४, १५ आणि स्टॅबलिंग लाइन १५ वर घेतला जाणार आहे. 'रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी' (आरएलडीए) द्वारे स्टेशन पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात पायाभरणी आणि इतर अत्यंत महत्त्वाची कामे पूर्ण केली जातील, ज्यानंतर प्लॅटफॉर्म पुन्हा रेल्वे वाहतुकीसाठी खुले केले जातील.
बाधित होणाऱ्या रेल्वे गाड्यांची यादी
एकूण ८ गाड्यांपैकी ७ गाड्या दादरला, तर १ गाडी ठाणे स्थानकातच आपली यात्रा समाप्त करेल.
११००२ बल्लारशाह–CSMT नंदीग्राम एक्सप्रेस (दादरपर्यंत)
१२८१० हावडा–CSMT एक्सप्रेस (दादरपर्यंत)
१२११२ अमरावती–CSMT एक्सप्रेस (दादरपर्यंत)
११०२० भुवनेश्वर–CSMT कोणार्क एक्सप्रेस (दादरपर्यंत)
२२१२० मडगाव–CSMT तेजस एक्सप्रेस (दादरपर्यंत)
२२१४४ बिदर–CSMT एक्सप्रेस (दादरपर्यंत)
२२१०८ लातूर–CSMT एक्सप्रेस (दादरपर्यंत)
१२१३४ मंगळुरू–CSMT एक्सप्रेस (ठाणे स्थानकापर्यंत)