Mumbai : सीएसएमटी भुयारी मार्ग प्रदूषणाच्या विळख्यात; BMC मुख्यालयाजवळच अनधिकृत विक्रेत्यांचे बस्तान संग्रहित छायाचित्र | X-@mumbaimatterz
मुंबई

Mumbai : सीएसएमटी भुयारी मार्ग प्रदूषणाच्या विळख्यात; BMC मुख्यालयाजवळच अनधिकृत विक्रेत्यांचे बस्तान

एकीकडे मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या पुढाकाराने ‘पादचारी प्रथम’ मोहीम राबवून रस्ते आणि पदपथ मोकळे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे महापालिका मुख्यालयाच्या अगदी शेजारी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील भुयारी मार्गावर अनधिकृत फेरीवाल्यांनी कब्जा केल्याचे चित्र आहे.

Swapnil S

मुंबई : एकीकडे मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या पुढाकाराने ‘पादचारी प्रथम’ मोहीम राबवून रस्ते आणि पदपथ मोकळे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे महापालिका मुख्यालयाच्या अगदी शेजारी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील भुयारी मार्गावर अनधिकृत फेरीवाल्यांनी कब्जा केल्याचे चित्र आहे.

मुंबई महापालिका मुख्यालयाजवळच भूयारी मार्गात फेरीवाल्यांचे अतिक्रमण, फटाक्यांचा धूर, जागोजागी साचणारा कचरा, दुर्गंधी आणि अपुऱ्या वायुविजनामुळे या मार्गातून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या खेळण्यातील आवाज करणाऱ्या बंदुका आणि त्यासाठी लागणाऱ्या रोलचे प्रात्यक्षिक दाखवताना धूर निर्माण होत असल्याने प्रदूषणातही भर पडत आहे. विशेष म्हणजे, महापालिका मुख्यालयाच्या नाकाखालीच ही परिस्थिती असतानाही ए वॉर्ड प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

पादचाऱ्यांची कसरत

रेल्वे स्थानक परिसरातील पदपथ आणि पादचारी मार्ग अतिक्रमणमुक्त ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार पादचाऱ्यांना मोकळेपणाने चालता यावे, यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, सीएसएमटी भुयारी मार्गातील परिस्थिती या प्रयत्नांना हरताळ फासणारी ठरत आहे.

दुकानदारांकडूनही नियम धाब्यावर

केवळ अनधिकृत फेरीवालेच नव्हे, तर काही परवानाधारक दुकानदारांकडूनही दुकानाबाहेरील जागेचा वापर करून वस्तूंची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. कपडे, खेळणी आणि खाद्यपदार्थांची विक्री भुयारी मार्गाच्या कानाकोपऱ्यात सुरू असते. सीएसएमटीच्या प्रवेशद्वारांजवळील पायऱ्यांवर मोबाइलसंबंधित वस्तूंची विक्रीही केली जाते. त्यामुळे रेल्वे स्थानकात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई धमक्यांनी हादरली! महापौर कार्यालय, अमिताभ यांचे निवासस्थान, शैक्षणिक संस्थांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

ऑडिओ क्लिपप्रकरणी फॉरेन्सिक तपास; महायुतीत बेबनाव वाढत चालला

FSSAI च्या नियमांना महाराष्ट्राचे उच्च न्यायालयात आव्हान; राज्याच्या अधिकारांवर केंद्राने अतिक्रमण केल्याचा आरोप

भारत-चीन सैन्यात चकमकी; अरुणाचलबाबत इंडो-तिबेट सीमा दलाच्या महासंचालकांचा गौप्यस्फोट

चीनला क्लीनचिट देणे त्वरित थांबवा! काँग्रेसचा घणाघात