छाया सौ. सलमान अन्सारी
मुंबई

दादर कबुतरखाना परिसरात स्थानिकांना जमण्यास पोलिसांचा विरोध

गेल्या काही दिवसांपासून कबुतरखाना बंदी प्रकरणी वाद शिगेला पोहोचला आहे. या प्रकारणी १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता स्थानिक मराठी नागरिक घटनास्थळी जमणार आहेत. मात्र, पोलिसांनी याला विरोध केला आहे. तसेच या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

Swapnil S

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कबुतरखाना बंदी प्रकरणी वाद शिगेला पोहोचला आहे. या प्रकारणी १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता स्थानिक मराठी नागरिक घटनास्थळी जमणार आहेत. मात्र, पोलिसांनी याला विरोध केला आहे. तसेच या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

यासाठी कबुतरखाना कायमस्वरूपी बंद करावा या मागणीसाठी १३ ऑगस्ट रोजी स्थानिक मराठी नागरिकांसह मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते एकत्र येणार होते. तसेच यासाठी बुधवारी सर्वांनी दादरमध्ये एकत्र येण्याचे आवाहन समितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते. त्यानंतर पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे.

कबुतरांना खाद्य देणे सुरूच

येथील एका इमारतीवर कबुतरांना दाणे टाकण्यात येत आहे, असा व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

येते चार दिवस मुंबई परिसरात ऑरेंज अलर्ट

GST ची हंडी उतरणार; स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी केली दरात व्यापक बदलाची घोषणा

स्वातंत्र्य टिकवण्यासाठी भारतीयांनी त्याग करणे आवश्यक! सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत ठाकरे बंधू एकत्र; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे-सेना युती; खासदार संजय राऊतांची घोषणा

दहीहंडी उत्सवाला यंदा राजकीय रंग; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाखोंच्या बक्षिसांची लयलूट