मुंबई

विरार कारशेडमधील रिकाम्या लोकलमध्ये आढळला मृतदेह; रेल्वे पोलिसांकडून तपास सुरु

हा मृतदेह कोणाचा? या व्यक्तीचा मृत्यू कशाने झाला? ही आत्महत्या आहे की हत्या? याबाबतचा तपास रेल्वे पोलिसांकडून केला जात आहे.

Swapnil S

विरार लोकल कारशेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारशेडमध्ये नियमीत देखभाल करत असताना लोकल ट्रेनच्या डब्यात लटकलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास हा मृतदेह सापड्याचे सांगितले जात आहे.या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री १० च्या सुमारास, ट्रेन विरारहुन आल्यानंतर मृतदेह आढळून आला आहे. विरार येथील लोकल कारशेडमध्ये लोकल ट्रेनची नियमीत तपासणी सुरु असताना एका व्यवस्थापकाला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. रेल्वे अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी जवळच्या रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.तसेच यापुढील प्रक्रिया कायदेशीर करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, कारशेडमधील रिकाम्या लोकलमध्ये हा मृतदेह सापल्याने एकच खळबळ उडाली होती. हा मृतदेह कोणाचा? या व्यक्तीचा मृत्यू कशाने झाला? ही आत्महत्या आहे की हत्या? याबाबतचा तपास रेल्वे पोलिसांकडून केला जात आहे.

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

ओबीसी महासंघाचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती; पूर आणि भूस्खलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

मुंबई, उपनगरात ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल; ५ सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी आता ८ सप्टेंबरला

१३ सप्टेंबरला मोदी मणिपूर दौऱ्यावर? कुकी समूहासोबत शांतता करार