मुंबई

'त्या' तृतीयपंथीला फाशीची शिक्षा; पैसे दिले नाहीत म्हणून चिमुरडीचे अपहरण करून लैंगिक अत्याचारानंतर केली होती हत्या

मुलगी झाली म्हणून पैशांची मागणी पूर्ण न केल्याने आरोपीने तीन महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि तिची हत्या करून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड

Swapnil S

मुंबई : अपहरण, लैंगिक अत्याचारासह हत्येच्या गुन्ह्यांत कन्हैया ऊर्फ कन्नू दत्ता चौगुले या २४ वर्षांच्या तृतीयपंथीला विशेष सेशन कोर्टाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली आहे. मुलगी झाली म्हणून पैशांची मागणी पूर्ण न केल्याने आरोपीने तीन महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि तिची हत्या करून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकणी दाखल असलेल्या भादंविसह पोक्सोच्या सर्वच कलमांतर्गत आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

तक्रारदार कफ परेड परिसरात राहत असून जुलै २०२१ रोजी त्यांना मुलगी झाली होती. त्यामुळे त्यांच्या घरी कन्हैया गेला होता, त्याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला होता. त्याचा कन्हैयाच्या मनात प्रचंड राग होता. त्यातून त्याने ९ जुलै २०२१ रोजी त्यांच्या तीन महिन्यांच्या मुलीचे अपहरण केले होते. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह समुद्राच्या खाडीच्या चिखलात पुरून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी काही तासांत पळून गेलेल्या कन्हैया चौगुले याला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध भादंविसह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर केले होते.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी