मुंबई

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी

मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला कॉल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका तरुणीला आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर तिला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला कॉल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका तरुणीला आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर तिला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. ही तरुणी मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बुधवारी सकाळी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला एका महिलेने कॉल केला. तिने नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट असल्याचे सांगून त्यासाठी शस्त्रे तयार असल्याची माहिती दिली. त्यानंतर तिने तिचा मोबाईल फोन बंद केला. पोलिसांनी तपास करून तरुणीला कांदिवली येथून ताब्यात घेतले व चौकशीअंती नोटीस देऊन सोडून दिले.

CBSE चा मोठा निर्णय! दहावीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा धोरणातून सूट; नववीतील विद्यार्थ्यांसाठीही नवे नियम

नसरापूर अत्याचार प्रकरण : आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा; पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

नसरापूर निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "अशा नराधमांना...

श्रद्धा कपूरच्या 'ईठा'वर नारायणगावकर कुटुंबीयांची नाराजी; चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी

राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी बंधनकारक; नियम मोडल्यास १ लाखांचा दंड, मान्यताही रद्द