(Photo-X/@mybmc)
मुंबई

Mumbai : थकबाकीदारांची खैर नाही; मालमत्ता जप्त करून लिलाव करा - अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत मालमत्ता कर आहे. ज्या प्रकरणात न्यायालयाचे कारवाई न करण्याबाबत आदेश असतील, अशी प्रकरणे वगळून मालमत्ता कर न भरणाऱ्यांची मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याचा धडाका सुरू करा, असे सक्त आदेश पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी कर निर्धारण व संकलन विभागाला दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत मालमत्ता कर आहे. ज्या प्रकरणात न्यायालयाचे कारवाई न करण्याबाबत आदेश असतील, अशी प्रकरणे वगळून मालमत्ता कर न भरणाऱ्यांची मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याचा धडाका सुरू करा, असे सक्त आदेश पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी कर निर्धारण व संकलन विभागाला दिले आहेत. दरम्यान, ज्या व्यावसायिकांनी अद्याप करत मालमत्ता कर भरला नसेल त्यांचे पाणी कनेक्शन कट करा, असा आदेश डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.

महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १ एप्रिल २०२५ पासून ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ५,४२६ कोटी ८१ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. तसेच, पुढील दोन महिन्यांसाठी मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीने व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांनी तो लवकरात लवकर भरावा, असे आवाहन अतिरिक्‍त पालिका आयुक्‍त अश्विनी जोशी यांनी केले आहे. त्यांनी कर निर्धारण व संकलन विभागाच्‍या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी सहआयुक्‍त विश्‍वास शंकरवार, सहायक आयुक्‍त गजानन बेल्‍लाळे यांच्‍यासह करनिर्धारण व संकलन खात्‍याचे अधिकारी उपस्थित होते.

तत्काळ होणार कारवाई

कर भरण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार जप्ती व अटकावणीची कठोर कारवाई तत्काळ करण्यात यावी. या कारवाईमध्ये भूखंड, निवासी व व्यावसायिक इमारती, व्यावसायिक गाळे तसेच औद्योगिक गाळे यांचा समावेश करण्यात यावा, असेही त्या म्हणाल्या.

ऑफलाइन पद्धतीने केवायसीची सुविधा!

मालमत्तेचे क्षेत्रफळ, वापर (निवासी/ व्यावसायिक/ औद्योगिक), मालकी हक्क, संपर्क तपशील (भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी) आदी माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी केवायसी आवश्यक आहे. यामुळे मालमत्ता कराचे अचूक मूल्यांकन होऊन करआकारणी व वसुली अधिक प्रभावीपणे करता येईल. केवायसी प्रक्रिया महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने तसेच संबंधित प्रशासकीय विभाग कार्यालयांमार्फत ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी मालमत्ता करधारकांनी प्रशासकीय विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन डॉ. अश्विनी जोशी यांनी केले.

Monsoon Update : पुढील सात दिवस पाऊस रजेवर; पुणे वेधशाळेचा अंदाज

Mumbai : पावसाळी दुर्घटना रोखण्यात कमी पडलो! 'झाडांभोवतीचे काँक्रीट काढण्याची जबाबदारी अभियंत्यांची'; अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांची कबुली

अनिल अंबानी ग्रुपवर EDची मोठी कारवाई; १,०२१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

...तर बावनकुळे उत्तराधिकारी : संजय राऊत

राज्य नेतृत्वबदलाच्या चर्चेला उधाण; फडणवीसांना दिल्लीत प्रमोशन, तर मुख्यमंत्रीपदासाठी बावनकुळेंचे नाव?