मुंबई

आरोग्य विम्याचे पैसे देण्यास विलंब; ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला १ लाखाचा दंड, पॉलिसीचे पैसे वेळेत द्या - हायकोर्टाचा आदेश

आरोग्य विमा पॉलिसीचे पैसे मिळविण्यासाठी वृद्ध पॉलीसीधारकाला उंबरे झिजवायला लावणाऱ्या विमा कंपन्यांना तंबी देताना उच्च न्यायालयाने ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला.

Swapnil S

मुंबई : आरोग्य विमा पॉलिसीचे पैसे मिळविण्यासाठी वृद्ध पॉलीसीधारकाला उंबरे झिजवायला लावणाऱ्या विमा कंपन्यांना तंबी देताना उच्च न्यायालयाने ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला. न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने विमा लोकपालांच्या आदेशानंतर पॉलिसीचे पैसे दिले जात नाहीत. ही एक प्रकारे नागरिकांची छळवणूक आहे, नागरिकांना आरोग्य विमा पॉलिसीचे पैसे वेळेत द्या, त्यासाठी पॉलीसीधारकाला कंपन्यांच्या कार्यालयाचे उंबरे झीजवायला लावून नका, असा आदेशच सर्व विमा कंपन्यांना दिला.

विमा लोकपालांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला आरोग्य विमा पॉलिसीचे २७ लाख १३ हजार ५८२ रुपये भरत देढिया या ७० वर्षीय पॉलिसी धारकास देण्याचे आदेश दिले. या आदेशाविरोधात कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठा समोर सुनावणी झाली.

यावेळी खंडपीठाने विमा कंपन्यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पॉलिसीधारकाला आरोग्य विमा पॉलिसीचे पैसे देण्यास टाळाटाळ करणे म्हणजेच त्या पॉलिसीधारकाची एक प्रकारे छळवणूकच आहे, अशा शब्दांत कंपनीवर ताशेरे ओढत कंपनीला एक लाखाचा दंड ठोठावला. तसेच दंडाची रकमेबरोबरच ३ मे२०२१ च्या आदेशान्वये लोकपालांनी मंजूर केलेली संपूर्ण रक्कम ७ टक्के व्याजासह याचिकाकर्त्या देढिया यांना पुढील चार आठवड्यांच्या आत द्या, असे आदेशच कंपनीला दिले.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश