मुंबई

रस्ते दुरुस्ती कामांत वेळकाढूपणा भोवला ; तीन कंत्राटदारांना १६ कोटींचा दंड

नवशक्ती Web Desk

रस्ते दुरूस्तीची कामे नियोजित वेळेत सुरू न करण्यात आल्याने मुंबई महापालिकेने तीन कंत्राटदारांना देण्यात येणारी आगाऊ ६०० कोटींची रक्कम रोखून धरली आहे. तसेच कामाला विलंब झाल्याने तीन कंत्राटदारांना १६ कोटी रुपये दंड ठोठावला आहे. दरम्यान, कंत्राटदारांने वेळेत कामे सुरू न केल्याने एप्रिलपासून सुरू होणारी रस्त्यांची कामे मात्र ठप्प पडली आहेत.

महापालिकेने मुंबई खड्डेमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने कामांना सुरुवात केली आहे. येत्या दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ४०० किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे, त्यासाठी तब्बल सहा हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामांसाठी कंत्राटदारांना कामाचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. ही कामे सुरू करण्यासाठी पालिकेने निश्चित कालावधी ठरवला होता. मात्र कंत्राटदाराने ठरलेल्या कालावधीत कामांना सुरुवात केली नाही. निविदा अटींनुसार कामांचे आदेश दिल्यानंतर कंत्राटदारांना एकूण कंत्राटाच्या १० टक्के म्हणजे ६०० कोटी रुपये आगाऊ रक्कम मिळणार होती. त्यानुसार दोन हप्त्यात प्रत्येकी ३०० कोटी रुपये वितरित केले जाणार होते.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

Marathi Serial: लोकप्रिय मालिका 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' प्रेक्षकांपुढे येणार नवीन अवतारात!