विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करा; सदा सरवणकर यांच्या कन्येची आयुक्तांकडे धाव (Photo-X)
मुंबई

विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करा; सदा सरवणकर यांच्या कन्येची आयुक्तांकडे धाव

दादरमधील प्रभाग क्रमांक १९१ मधून २०२६ची मुंबई महापालिका निवडणूक लढविणाऱ्या ठाकरे सेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांच्या नगरसेवकपदाच्या अपात्रतेची मागणी जोर धरू लागली आहे.

Swapnil S

मुंबई : दादरमधील प्रभाग क्रमांक १९१ मधून २०२६ची मुंबई महापालिका निवडणूक लढविणाऱ्या ठाकरे सेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांच्या नगरसेवकपदाच्या अपात्रतेची मागणी जोर धरू लागली आहे. माजी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या आणि या निवडणुकीतील राऊत यांच्या प्रतिस्पर्धी प्रिया गुरव यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले.

प्रिया गुरव यांनी राऊत यांनी ओबीसी महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभागातून अवैध कुणबी जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवल्याचा आरोप केला आहे. २४ ऑगस्ट रोजी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी पालघर जिल्हा जात पडताळणी समितीच्या २० ऑगस्टच्या आदेशाचा संदर्भ दिला आहे. हा आदेश आपल्याला ई-मेलद्वारे प्राप्त झाल्याचे गुरव यांनी नमूद केले आहे.

प्रभाग क्रमांक १९१ हा ओबीसी महिलांसाठी राखीव होता. राऊत यांनी शिवसेनेच्या उमेदवारीवरून निवडणूक लढविताना आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी ओबीसी जात प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पालघर जिल्हा जात पडताळणी समितीने २१ ऑगस्ट रोजी राऊत यांचे ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश दिल्याचे प्रिया गुरव यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राऊत यांनी हा निर्णय राजकीय दबावाखाली घेण्यात आल्याचा आरोप केला आहे. आपण ओबीसी प्रवर्गातीलच असून आपल्या कुटुंबाचे मूळ गाव पालघर जिल्ह्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राऊत यांना १३ हजार २३६ मते मिळाली, तर प्रिया गुरव यांना १३ हजार ३९ मते मिळाली. अवघ्या १९७ मतांनी राऊत विजयी झाल्या. या निवडणुकीत या प्रभागातून केवळ दोन उमेदवार रिंगणात होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : रुस्तमजी क्राऊनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हातोडा; सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमधील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

नारीशक्तीने रोखला शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्ग; प्रशासनाच्या निषेधार्थ खड्डेमय महामार्गावर साजरी केली मंगळागौर

क्षेपणास्त्र तंत्रज्ञान खासगी उद्योगांना हस्तांतरित; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मंजुरी

कांदा एक्स्प्रेस आज दिल्लीत पोहचणार; ८०० टनाची पहिली खेप, ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांची माहिती

...तर MSME चा निधी पुरवठा ठप्प होईल; ‘एफआयएसएमई’ची भीती; RBI चा NBFC च्या कर्जावर नियंत्रणाचा विचार