Mumbai : 'वंदे भारत'मधील उद्घोषणा सुधारावी; विमान आणि रेल्वेतील उद्घोषणेबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : 'वंदे भारत'मधील उद्घोषणा सुधारावी; विमान आणि रेल्वेतील उद्घोषणेबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र

बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक तथा नवघरचे माजी सरपंच चंद्रशेखर धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विविध महत्त्वाच्या मागण्या आणि सूचनांचे पत्र देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे.

Swapnil S

वसई : बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक तथा नवघरचे माजी सरपंच चंद्रशेखर धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विविध महत्त्वाच्या मागण्या आणि सूचनांचे पत्र देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे. या पत्राची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली असून याप्रकरणी संबंधितांकडे मागण्यांच्या पूर्ततेसाठी पत्र रवाना केल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून धुरी यांना कळविण्यात आले आहे.

धुरी यांनी पत्रात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या वंदे भारत रेल्वे गाड्यांमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराष्ट्र टर्मिनस' अशी उद्घोषणा करण्यात येते. महाराजांचे नाव मराठी माणसाला अभिमानास्पद वाटते आणि ते नीट उच्चारावे असे प्रवाशांना वाटते. त्यामुळे तिथे 'छत्रपती शिवाजी महाराष्ट्र टर्मिनस'ऐवजी 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस' असे बोलले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. अंदमानमधील विमानतळास भारत सरकारने 'स्वातंत्र्यवीर सावरकर विमानतळ' असे नाव दिले असून तिथे सावरकरांचा पुतळा व फोटो आहे. मात्र विमानातून अंदमानकडे येताना ही घोषणा होत नाही. सेल्युलर जेलमध्ये जाऊन सावरकरांच्या कोठडीचे जाणाऱ्या सर्वांच्या दर्शन घेण्यासाठी सावरकरप्रेमींसह अभिमानासाठी ही उद्घोषणा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

रेल्वेच्या वाढत्या प्रवाशांमुळे मुंबईसह भारतातील बहुसंख्य रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी ३-४ पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. प्रवाशांची व सहप्रवाशांची चुकामूक टाळण्यासाठी या पुलांना क्रमांक देण्याची सूचना धुरी यांनी केली आहे. मुंबई विमानतळावरून प्रवाशांना घरी घेऊन येणारी भाड्याची वाहने गॅस भरण्यासाठी गॅस पंपावर ३० मिनिटांहून अधिक काळ थांबतात.

रात्रीच्या वेळी अंधार, स्वच्छतागृहांची कमतरता आणि चहाची दुकाने नसताना प्रवाशांना गाडीबाहेर यावे लागते. हा त्रास टाळण्यासाठी कारमालकांनी आधीच गॅस भरून ठेवण्याबाबत वाहतूक विभागाने तोडगा काढण्याची गरज असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. या सर्व छोट्या वाटणाऱ्या पण महत्त्वाच्या समस्यांवर मुख्यमंत्री कार्यालयाने संबंधित विभागांकडे पत्र रवाना करून सकारात्मक पाऊल उचलले आहे.

अमराठी रिक्षाचालकांसाठी मीरा-भाईंदरमध्ये मराठी कार्यशाळा सुरू; दहावीत प्रथम आलेली हिंदी भाषिक सपना साह देणार मराठीचे धडे

कराडच्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला! १८ ते २२ मे उमेदवारी अर्ज; २१ जूनला मतदान, २३ जूनला मतमोजणी

'स्मार्ट' योजनेतून वीज ग्राहकांना मिळणार अतिरिक्त अनुदान; दुर्बल ग्राहकांसाठी राज्य सरकारचे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य'

भिवंडीत एक्झॉस्ट फॅनवर मनपाची कारवाई होणार; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथक नियुक्त

Thane : भाजप नगरसेवकांच्या निलंबनाची शिंदे सेनेची मागणी