छायाचित्र : सलमान अनसारी
मुंबई

Mumbai : धारावीत अग्निभडका! झोपडपट्टीला भीषण आग; हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत

धारावीतील ६० फूट रस्त्याजवळील नवरंग कंपाऊंड येथील झोपडपट्टीला शनिवारी दुपारी आग लागल्यामुळे त्याचा मोठा फटका उपनगरीय रेल्वेसेवेला बसला. रेल्वे फाटकाला लागूनच असलेल्या झोपडीला ही आग लागल्यामुळे वांद्रे-सीएसएमटी दरम्यानची हार्बर रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली.

Swapnil S

मुंबई : धारावीतील ६० फूट रस्त्याजवळील नवरंग कंपाऊंड येथील झोपडपट्टीला शनिवारी दुपारी आग लागल्यामुळे त्याचा मोठा फटका उपनगरीय रेल्वेसेवेला बसला. रेल्वे फाटकाला लागूनच असलेल्या झोपडीला ही आग लागल्यामुळे वांद्रे-सीएसएमटी दरम्यानची हार्बर रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली. सुदैवाने या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

धारावी रेल्वे फाटक, प्लॉट नंबर-१, नवरंग कंपाऊंड, ६० फिट रोड, नूर हॉटेलनजीक तळमजला अधिक एक मजली घराला शनिवारी दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमाराला आग लागली. या आगीत घरातील सामान जळून खाक झाले. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यास सुरुवात केली. मात्र साडेबारा वाजताच्या सुमारास आग आणखीन भडकल्याने सदर आग स्तर-१ची असल्याचे अग्निशमन दलाने जाहीर केले. तसेच, आगीचा आणखीन भडका उडाल्याने आगीची तीव्रता पाहता अग्निशमन दलाने दुपारी दीड वाजता स्तर-२ची ही आग असल्याचे जाहीर केले होते. मात्र सदर घराला लागलेल्या आगीमुळे घराजवळील हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी ६ फायर इंजिन, १० जम्बो वॉटर टँकरच्या सहाय्याने सदर आगीवर दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास नियंत्रण मिळवून आग संपूर्णपणे विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टाळला. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर हार्बर मार्गावरील डाऊन मार्गावरील लोकल सेवा दुपारी २.११ वाजता सुरू झाली, तर पश्चिम रेल्वेची अप जलद मार्गिका दुपारी २.३० वाजता सुरू करण्यात आली. तर हार्बर मार्गावरील अप मार्गिका दुपारी ३.३४ वाजता सुरू केली. या घटनेमुळे हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली.

सीएसएमटी-गोरेगाव लोकल सेवेला फटका

माहीम स्थानकालगत असलेल्या धारावीतील झोपडपट्टीला लागलेल्या आगीचा फटका हार्बर मार्गावरील सीएसएमटी-गोरेगाव लोकल सेवेला बसला. सीएसएमटी-गोरेगाव दरम्यान तब्बल दोन तास लोकल सेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. आगीचे लोळ रेल्वे रुळांच्या बाजूला येऊ लागल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून ओव्हरहेड वायरचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून पाच लोकल वेगवेगळ्या ठिकाणी थांबविण्यात आल्या. हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल सेवा बंद करण्यात आली होती.

शाळा गाठणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी दिलासा देणार; शालेय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन; एसटी बस रद्द झाल्यास मिळणार तत्काळ मदत

मराठी शाळा बंदचा डाव! मुंबई मुख्याध्यापक संघटनेचा आरोप; निर्गमित आदेश मागे घेण्याची मागणी

केंद्रांचा पाच बिबट्यांच्या नसबंदीला होकार; राज्य सरकारला हवी तातडीने ११५ बिबट्यांच्या नसबंदीची परवानगी

Beed : अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक; चौघे गंभीर जखमी

क्रुझर गाडीचे टायर फुटून ५ जागीच ठार! देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर सोलापूरमध्ये काळाचा घाला