Diwali 2026 : यंदा हँडमेड वस्तूंच्या खरेदीवर ग्राहकांचा भर; ‘इको-फ्रेंडली’ सजावटीला पसंती 
मुंबई

Diwali 2026 : यंदा हँडमेड वस्तूंच्या खरेदीवर ग्राहकांचा भर; ‘इको-फ्रेंडली’ सजावटीला पसंती

दिवाळी म्हटले की आकर्षक विद्युत रोषणाई, आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या आणि फराळाची रेलचेल हे सर्व आलेच.

गिरीश चित्रे

मुंबई : दिवाळी म्हटले की आकर्षक विद्युत रोषणाई, आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या आणि फराळाची रेलचेल हे सर्व आलेच. मात्र यंदाच्या दिवाळीत पारंपरिक सणाला पर्यावरणपूरकतेची जोड मिळताना दिसत असून सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीत नवे ट्रेंड पाहायला मिळत आहेत. प्लास्टिकच्या सजावटीच्या वस्तूंपेक्षा कागद, कापड, बांबू आणि नैसर्गिक साहित्यापासून तयार केलेल्या आकाश कंदिलांना ग्राहक पसंती देत आहेत. मातीच्या पणत्या, हस्तनिर्मित पितळी दिवे आणि आकर्षक फुलांच्या रांगोळ्यांनी बाजारपेठा सजल्या असून ठीकठिकाणी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे.

यंदा दिवाळीच्या सजावटीमध्ये पारंपरिक आणि आधुनिक शैलीचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे. मोर, कमळ, ताऱ्यांच्या आकारातील आकाशकंदील, कापडी भरतकामाचे कंदील आणि बांबूपासून तयार केलेल्या सजावटीच्या वस्तू ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

सजावटीच्या रांगोळ्या हा नवा ट्रेंड

रांगोळीच्या प्रकारातही नावीन्य आले आहे. फुलांच्या पाकळ्यांपासून तयार केलेल्या रांगोळ्या, नैसर्गिक रंगांचा वापर, आकर्षक स्टेन्सिल रांगोळ्या आणि पुन्हा वापरता येणाऱ्या सजावटीच्या रांगोळ्या हा यंदाचा नवा ट्रेंड ठरत आहे. घराच्या प्रवेशद्वारावर तोरणे, झेंडूच्या माळा, आकर्षक विद्युत रोषणाई आणि पाण्यावर तरंगणाऱ्या पणत्यांनी सजविलेल्या भांड्यांनाही पसंती मिळत आहे.

पर्यावरणपूरक भेटवस्तूंना मागणी

दिवाळीच्या भेटवस्तूंमध्येही पर्यावरणपूरक वस्तू, शोभेची रोपे, हस्तकलेच्या वस्तू आणि प्लास्टिकविरहित पॅकिंग असलेल्या भेटवस्तूंचा पर्याय पुढे येत आहे. ‘इको-फ्रेंडली’ म्हणजेच पर्यावरणपूरक भेटवस्तूंची संकल्पना मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहे. यामध्ये बीजरोपण किट्स, मातीचे दिवे, हातमागावर विणलेल्या गिफ्ट पिशव्या, नैसर्गिक मेणबत्त्या आणि घरगुती मिठाई सेट्स यांसारख्या पर्यावरणपूरक भेटवस्तूंना मोठी पसंती मिळत आहे. प्लास्टिक, थर्माकोल आणि रासायनिक रंगांपासून दूर राहून, निसर्गाशी सुसंवाद साधणाऱ्या भेटवस्तूंची मागणी वाढत आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

...तर विमान प्रवास करू नका; ७०० टक्के दरवाढ याचिकेवर सुप्रीम कोर्टाची धक्कादायक सूचना

तिकीट दरांमध्ये हस्तक्षेप करण्याचे सरकारला अधिकार; प्रवासी भाड्याबाबत नवे नियम जाहीर

न्यायालये बॉम्बने उडवण्याची धमकी; ठाणे, सांगली, परभणी, हिंगोली, बीड, सोलापूर न्यायालयात आले ई-मेल

राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर? नाराज नेत्यांनी घेतली अमित शहांची भेट; पवार माय-लेक वगळून NCP च्या विलीनीकरणाची चाचपणी

‘दिया’च्या आवाहनावरून गदारोळ; फटाके न फोडण्याच्या मिर्झाच्या वक्तव्याने राजकीय वातावरण पेटले, भाजपच्या आक्षेपानंतर व्हिडीओ गायब