PM
PM
मुंबई

दुमजली पार्किंग, निवासी, व्यवसायिक हब ;तीन बेस्ट बस डेपोंचा पुनर्विकास

Swapnil S

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात एसी डबलडेकर बसेसचा ताफा दाखल होत आहे. डबलडेकर बसेस पार्किंग करण्यासाठी तीन डेपोत सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. देवनार, दिंडोशी, वांद्रे या डेपोत दुमजली पार्किंग व्यवस्था करण्यात येत असून, निवासी व व्यवसायिक हब बनवण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवारी निविदा मागवण्यात आल्याने या तीन डेपोत दुमजली पार्किंग, चार्जिंग स्टेशन, निवासी व व्यावसायिक हब असणार आहे.

बेस्टच्या बसेसना प्रवाशांची पसंती लक्षात घेता आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बेस्ट उपक्रमाने इलेक्ट्रिक बसेस बेस्टच्या ताफ्यात सामील होत आहेत. बसेस पार्किंग करण्यासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे. त्यामुळे  बस आगारात दुमजली पार्किंग उभारल्यास बसेस पार्क करणे शक्य होणार आहे. भविष्यात बस गाड्या पार्किंगसाठी जागेचा प्रश्न निर्माण होऊ नये याचा विचार करून बेस्टने दुमजली बस पार्किंग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देवनार, दिंडोशी आणि वांद्रे हे तीन आगार दुमजली पार्किंगसाठी निवडण्यात आली आहेत. यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

आयएफसीकडून अभ्यास!

या बस गाड्यांच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दुमजली पार्किंग उभारले जाणार आहे. तसेच डेपोचा पुनर्विकास करण्यासाठी इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन ( आयएफसी ) ही वर्ल्ड बँकेची सल्लागार असलेली कंपनी या सर्वाचा अभ्यास करत आहे.

सद्यस्थितीत तीन डेपोतील सुविधा!

देवनार १६०, वांद्रे ११०, दिंडोशी १५० पार्किंग , देवनार व दिंडोशी सी एन जी आहे, तर वांद्रे बस डेपोत सीएनजी सुविधा उपलब्ध नाही, तर तिन्ही बस आगारात कॅन्टीनची सुविधा उपलब्ध आहे.

मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना 'सर्वोच्च' दिलासा; १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

Narendra Dabholkar Murder Case: दोघांना जन्पठेप, तिघांची निर्दोष सुटका; ११ वर्षांनी आला निकाल

अक्षय तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

मुंबई विद्यापीठाचे आदेश धाब्यावर! फक्त ३५३ कॉलेजेसने केली 'सीडीसी'ची स्थापना; विद्यापीठाकडून गंभीर दखल

प्रसिद्धीसाठी जनहित याचिकेचा वापर करू नका, हायकोर्टाने खडसावले; याचिकाकर्त्यांने याचिकाच मागे घेतली