मुंबई

निवडणूक कामातून रूग्णालयीन कर्मचाऱ्यांना वगळणार; पालिका प्रशासनाचे आश्वासन

लोकसभा निवडणूकीसाठी मुंबई महापालिकेतील बहुतांशी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. यात सर्वच खात्यातील कर्मचाऱ्यांची यादी प्रशासनाकडून पाठवण्यात आली आहे. यात अत्यावश्यक सेवेतील म्हणजे रुग्णालयांतील डॉक्टर, नर्सिंग, तंत्रज्ञ या संवर्गातील कर्मचारी-अधिकाऱ्यांना निवडणूक कर्तव्यार्थ पाठवले तर अत्यावश्यक सेवा कोलमडून जाईल.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापलिकेच्या अत्यावश्यक खात्यातील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाची जबाबदारी दिल्यास रुग्णसेवा कोलमडून पडेल, त्यामुळे रुग्णालयातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळावे, यासाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका आयुक्तांना पत्र देऊन लक्ष वेधले होते. याची दखल घेण्यात आली असून निवडणूक कामातून रुग्णालयातील तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांना वगळण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले असल्याचे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे-बापेरकर यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूकीसाठी मुंबई महापालिकेतील बहुतांशी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. यात सर्वच खात्यातील कर्मचाऱ्यांची यादी प्रशासनाकडून पाठवण्यात आली आहे. यात अत्यावश्यक सेवेतील म्हणजे रुग्णालयांतील डॉक्टर, नर्सिंग, तंत्रज्ञ या संवर्गातील कर्मचारी-अधिकाऱ्यांना निवडणूक कर्तव्यार्थ पाठवले तर अत्यावश्यक सेवा कोलमडून जाईल. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग, तंत्रज्ञ यासंवर्गातील कर्मचारी-अधिकाऱ्यांना या कामातून वगळावे, याकडे युनियनचे अध्यक्ष बाबा कदम यांनी पालिका आयुक्तांना पत्र देऊन लक्ष वेधले होते.

याची दखल घेऊन पालिका रूग्णालयातील डॉक्टर व नर्सिंग यांचे निवडणूक कर्तव्याचे आदेश रद्द केले. मात्र अत्यावश्यक सेवेतील तंत्रज्ञ संवर्गाला वरील कर्तव्यातून सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे-बापेरकर, सेक्रेटरी संजय वाघ व सल्लागार हरिश जामठे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा समन्वय अधिकारी सतीश बागल यांची भेट घेऊन चर्चा केली. चर्चेनंतर पालिका रुग्णालयातील रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष किरण तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ यासंवर्गातील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे डॉ. बापेरकर यांनी सांगितले.

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

IND vs WI, 2nd T20I : गोलंदाजांची आज पुन्हा कसोटी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत आघाडी घेण्याचे भारतापुढे आव्हान