मुंबई

विसर्जन सोहळा पाहायचाय? अनंत चतुर्दशीनिमित्त पश्चिम रेल्वेच्या रात्री ८ जादा लोकल फेऱ्या

भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने अनंत चतुर्दशी दिवशी मंगळवारी मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी चार लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : गिरगाव, दादर, जुहू चौपाटीवर होणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीचा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक घराबाहेर पडतात. या प्रवाशांच्या सोयीसाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी पश्चिम रेल्वेने रात्री जादा आठ लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

सार्वजनिक मंडळांच्या गणरायाचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी होते. त्यामुळे गणपती दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडतात. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने अनंत चतुर्दशी दिवशी मंगळवारी मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी चार लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चर्चगेटहून विरारसाठी रात्री १.१५, १.५५, २.२५ आणि पहाटे ३.२० वाजता लोकल सुटेल. परतीच्या मार्गावर विरारहून चर्चगेटसाठी रात्री १२.१५, १२.४५, १.४० आणि पहाटे ३ वाजता लोकल चालविण्यात येणार आहेत. तसेच चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट यादरम्यान धीम्या मार्गावर लोकल उपलब्ध असतील.

देशभरातील सार्वजनिक ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना हटवा; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

लाडकी बहीण योजनेत १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य

Thane : पालिका निवडणुकीची सूत्रे आमदार संजय केळकरांकडे; ठाण्यात शिंदे सेना आणि भाजपमध्ये तणाव वाढणार

बांगलादेशात कांद्याचे भाव शंभरी पार; भारतीय निर्यातदारांकडून आयातबंदी उठवण्याची मागणी

वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ! तिसऱ्या फेरीनंतरही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ३८७ जागा रिक्त