मुंबई

शिंदेंच्या कर्मचाऱ्यांचा उडाला पहिल्याच दिवशी गोंधळ; विधिमंडळातील दालनावरून तिढा

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्टाफचा गोंधळ उडाला. पहिल्या मजल्यावर शिंदेंच्या स्टाफचे कार्यालय होते. ते विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाला देण्यात आले. त्यामुळे विधान भवनात शिंदेंच्या स्टाफला कार्यालय नसल्याने त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला असून नाराजी व्यक्त केली.

Sagar Sirsat

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्टाफचा गोंधळ उडाला. पहिल्या मजल्यावर शिंदेंच्या स्टाफचे कार्यालय होते. ते विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाला देण्यात आले. त्यामुळे विधान भवनात शिंदेंच्या स्टाफला कार्यालय नसल्याने त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला असून नाराजी व्यक्त केली.

अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री व मंत्र्यांच्या स्टाफसाठी विधान भवनात कार्यालय उपलब्ध करून देण्यात येते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पूर्वीचे दालन क्रमांक ४२देखील विधानसभा उपाध्यक्षांना देण्यात आले आहे. दानवे यांना पहिल्या मजल्यावर दालन देण्यात आले आहे.

उपाध्यक्ष यांचे दालन आणि त्यांच्या स्टाफचे दालन समोरासमोर असल्याने ही व्यवस्था करण्यात आली आहे.

मात्र ही अदलाबदल करताना शिंदे यांच्या स्टाफला कार्यालय देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिंदे यांच्या स्टाफला, शिंदे यांच्या मुख्य दालनातील कॉन्फरन्स रूममधून कामकाज करावे लागले. शिंदे यांच्या स्टाफला अद्याप पर्यायी कार्यालय दिले गेलेले नसल्याने पहिल्याच दिवशी त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला, अशी नाराजी शिंदे यांच्या कार्यालयातील स्टाफने व्यक्त केली.

बनसोडेंना दालन दिल्याने वाद

विधानभवनाच्या तळमजल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ३२ क्रमांकाचे दालन आहे. शिंदे यांच्या कार्यालयाच्या शेजारी असलेले दालन क्रमांक ३० शिंदे यांच्या स्टाफसाठी होते. मात्र यंदा ते दालन बनसोडे यांच्या स्टाफला देण्यात आले आहे. त्यामुळे यावरून शिंदे यांच्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सोमवारी विधिमंडळात गोंधळ घातला.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती