मुंबई

ट्रॉम्बे येथे भावावर लहान भावाकडून प्राणघातक हल्ला

शीव हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. हल्ल्यानंतर पळून गेलेला लहान भाऊ सेहबाज रेहमत अली खान याच्याविरुद्ध ट्रॉम्बे पोलिासांनी गुन्हा दाखल केला आहे.

Swapnil S

मुंबई : ट्रॉम्बे येथे मोठ्या भावावर लहान भावाने चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यात अरबाज रेहमतअली खान हा गंभीररीत्या जखमी झाला असून, त्याच्यावर शीव हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. हल्ल्यानंतर पळून गेलेला लहान भाऊ सेहबाज रेहमत अली खान याच्याविरुद्ध ट्रॉम्बे पोलिासांनी गुन्हा दाखल केला आहे. खान कुटुंबीय ट्रॉम्बे येथे राहतात. अरबाज हा मॅनेजमेंटचे काम करतो, तर त्याचा लहान भाऊ सेहबाज हा काहीच काम करत नाही. दोन दिवसांपूर्वी सेहबाजने एका लहान मुलाशी भांडण झाले होते.

त्यामुळे अरबाजने त्यांच्या भांडणात मध्यस्थी करून दोघांमधील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर अरबाजने त्याला घरी नेण्याचा प्रयत्न केला होता; मात्र अरबाजने मध्यस्थी केल्याचा त्याच्या मनात राग होता. त्यातून रागाच्या भरात त्याने त्याने अरबाजवर चाकूने वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला आधी शताब्दी आणि नंतर शीव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

GST ५ आणि १८%; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

२३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा