मुंबई

अज्ञात वाहनाच्या धडकेने वयोवृद्धाचा मृत्यू

याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अपघाताची नोंद करून चालकाचा शोध सुरू केला आहे

प्रतिनिधी

मुंबई : भरवेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाच्या धडकेने नंदकुमार अनंत मळेकर या ६९ वर्षांच्या वयोवृद्धाचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी चालकाने घटनास्थळाहून पलायन केले आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अपघाताची नोंद करून चालकाचा शोध सुरू केला आहे. हा अपघात मंगळवारी रात्री साडेदहा वाजता विक्रोळीतील पूर्व दुतग्रती महामार्गावरील गोदरेज घोडारेज सिग्नलजवळ झाला. गोदरेज कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणारे नंदकुमार मंगळवारी रात्री घरी परतत असताना गोदरेज घोडारेज सिग्नलजवळ एका भरवेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या नंदकुमार यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून त्याचा शोध सुरू आहे.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन्...; मुलुंड टोलनाक्याजवळ अपघात, ८ ते ९ वाहने एकमेकांना आदळली

पाक लष्कराचा स्वतःच्याच नागरिकांवर हवाई हल्ला; खैबर पख्तूनख्वात ३० जणांचा बळी

आता नोकरी मिळवणे होणार सोपे! केंद्र सरकार तयार करतेय ‘डॅशबोर्ड’

मतदार यादी सखोल परीक्षणासाठी सज्ज व्हावे; केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश