मुंबई

मुंबई महापालिकेची निवडणूक २०१७ च्या प्लॅननुसार होणार,४५ हजार कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत असणार

प्रतिनिधी

आरक्षण सोडत जाहीर झाल्याने निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनेही निवडणूक संबंधित सगळ्या कामाची तयारी सुरू केली असून, प्रभाग संख्येत वाढ झाली असली तरी यंदाची निवडणूक २०१७ च्या प्लॅननुसार होणार आहे. कोरोनामुळे कर्मचारी व बुथच्या संख्येत वाढ करण्यात येणार होती; मात्र कोरोना आता नियंत्रणात आल्याने ४५ हजार कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असतील आणि बुथची संख्या नऊ हजारांच्या आसपास असेल, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली.

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाची पहिली लाट धडकली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या चार लाटा मुंबईत धडकल्या होत्या; मात्र योग्य उपचार पद्धती व मुंबईकरांची साथ यामुळे चारही लाटा परतवण्यात पालिकेला यश आले आहे. फेब्रुवारी २०२२मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडणार होत्या; मात्र अनेक कारणांमुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या; मात्र २९ जुलै रोजी आरक्षण सोडत जाहीर झाली आणि निवडणुका लवकरच होणार हे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई महापालिका प्रशासनाने आधीपासून तयारीला सुरुवात केली होती.

कोरोनाचे संकट लक्षात घेता पालिकेने बुथच्या संख्येत चार हजारांनी वाढ करत १३ हजार बुथ करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र कोरोना नियंत्रणात आल्याने २०१७च्या निवडणुकीत आठ हजार ५०० बुथ होते, तीच संख्या कायम ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तर कर्मचाऱ्यांची संख्या ४५ हजारांवरून ७० हजारांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यादृष्टीने कार्यवाहीदेखील सुरू करण्यात आली होती; मात्र सद्य:स्थितीत कोरोना नियंत्रणात आल्याने कर्मचारी संख्या ४५ ते ५० हजारांच्या घरात असतील, असेही ते म्हणाले.

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

माढ्यात फडणवीसांनीही टाकला डाव; अभिजित पाटील, धवलसिंह भाजपच्या गळाला?

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण