Mumbai : ११३ वर्ष जुना एल्फिन्स्टन ब्रिज होणार इतिहासजमा; आज मध्यरात्री अंतिम पाडकाम, लवकरच उभारणार डबल डेकर फ्लायओव्हर 
मुंबई

Mumbai : ११३ वर्ष जुना एल्फिन्स्टन ब्रिज होणार इतिहासजमा; आज मध्यरात्री अंतिम पाडकाम, लवकरच उभारणार डबल डेकर फ्लायओव्हर

या ठिकाणी आता डबल डेकर पूल उभारला जाणार असून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) राबवत आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईतील ऐतिहासिक ओळख असलेला ११३ वर्ष जुना एल्फिन्स्टन ब्रिज आता इतिहासजमा होणार आहे. शुक्रवारी (दि. ३) आणि शनिवारी (दि.४) मध्यरात्री या पुलाच्या अंतिम भागाचे पाडकाम करण्यात येणार असून, शहरातील मोठ्या पायाभूत प्रकल्पासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

नव्या प्रकल्पासाठी मार्ग मोकळा

'मिड डे' च्या वृत्तानुसार, एल्फिन्स्टन ब्रिजचे पाडकाम हे वरळी-शिवडी एलिव्हेटेड कॉरिडॉर (४.५ किमी) प्रकल्पाचा भाग आहे. या ठिकाणी आता डबल डेकर पूल उभारला जाणार असून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) राबवत आहे.

रेल्वे मार्गावरील काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MRIDC) कडून केले जात आहे.

पाडकाम का आवश्यक?

या पुलाची रुंदी आणि उंची वाढवण्याची गरज असल्यामुळे पाडकाम आवश्यक ठरले आहे. तसेच, याच मार्गावरून एलिव्हेटेड कॉरिडॉर जाणार असल्यामुळे नवीन संरचना उभारणे गरजेचे आहे.

महत्त्वाचा कनेक्टर

एल्फिन्स्टन ब्रिज हा प्रभादेवी आणि परळ परिसराला जोडणारा महत्त्वाचा पूर्व-पश्चिम मार्ग होता. नव्या पुलामुळे या भागातील वाहतूक अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विशेष रेल्वे ब्लॉक जाहीर

रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पाडकाम सुरळीत पार पाडण्यासाठी परळ ते करी रोड दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. हा ब्लॉक रात्री १२:३० ते पहाटे ४:३० या वेळेत लागू असेल. या काळात काही लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम होणार आहे.

कोणत्या गाड्यांवर परिणाम?

  • कोणार्क एक्सप्रेस

  • हावडा-CSMT मेल

  • मंगळुरू-CSMT एक्सप्रेस

या गाड्या माटुंगा ते भायखळा दरम्यान वळवण्यात येतील आणि दादर स्थानकावर दोन वेळा थांबतील.

इतिहासाचा शेवट

हा पूल १९१३ मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेने बांधला होता. त्यावेळी मद्रास प्रेसीडेंसीचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या नावावरून या पुलाला नाव देण्यात आले.

१२ सप्टेंबर २०२५ पासून पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. आता अंतिम टप्प्यातील पाडकामामुळे ब्रिटिशकालीन या संरचनेचा शेवट होऊन आधुनिक मुंबईच्या नव्या युगाची सुरुवात होणार आहे.

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...