मुंबई

सिद्धिविनायक मंदिरातील पैसे चोरणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक

प्रभादेवीतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरणाऱ्या एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धिविनायकसारख्या लोकप्रिय व कडक बंदोबस्त असलेल्या मंदिरातून चोरीची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Swapnil S

मुंबई : प्रभादेवीतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरणाऱ्या एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धिविनायकसारख्या लोकप्रिय व कडक बंदोबस्त असलेल्या मंदिरातून चोरीची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

दादर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. त्यानंतर, आरोपीला न्यायालयात नेले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच, यापूर्वीही त्याने अनेकवेळा पैसे चोरल्याचा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.

राजेंद्र पेंडुरकर असे या आरोपीचे नाव असून तो लोअर परळ परिसरातील रहिवासी आहे. त्याच्यावर दानपेटीतून १० हजार रुपये चोरल्याचा आरोप आहे. मात्र या प्रकरणात आणखी काही कर्मचारी सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून अधिक तपास सुरू आहे. तक्रारदार हा मंदिरातच कार्यरत असून शुक्रवारी सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना पेंडुरकर दानपेटीतून पैसे चोरताना दिसले. यानंतर तक्रारदारांनी याची माहिती तत्काळ वरिष्ठांना दिली. मंदिर ट्रस्टने मागील ८ ते १० दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी वारंवार दानपेटीतून पैसे चोरत असल्याचेसमोर आले. त्यानंतर ट्रस्टने दादर पोलिसांशी संपर्क साधून अधिकृत तक्रार नोंदवली.

पोलीस तपासादरम्यान आरोपीने फक्त १० हजार रुपये चोरल्याचे कबूल केले आहे. मात्र, वारंवार चोरी केल्याच्या संशयामुळे एकूण रक्कम अधिक असण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याबाबत तपास दादर पोलीस करत आहे.श्री सिद्धीविनायक मंदिर हे भारतातील भाविकांचे श्रद्धास्थान असून दररोज हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्सही मंदिरात दर्शनासाठी आवर्जुन येत असतात.

CJP Protest : 'अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन चालवण्याचा पोलिसांना अधिकार'; RAF च्या दारुगोळा वापराच्या नोंदी जतन करा - SC

'तुम्ही पतंजलीवर लक्ष द्या नाहीतर बंद पडेल'; रामदेव बाबांना अभिजीत दिपकेंचे प्रत्युत्तर

Mumbai : नदीनाल्यात कचरा टाकल्यास फौजदारी कारवाई; पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचा इशारा, CCTV ची नजर

तोरणमाळच्या झिपलाईनवर जीव टांगणीला! ३,५०० फूट दरीवर अडकला पर्यटक; थरार पाहून धडकी भरेल, बघा Video

आधी माफी मागितली, मग दानपेटी फोडली; नागपूरच्या शीतला देवी मंदिरातील चोरीचा VIDEO पाहून नेटकरी अवाक्!