राज ठाकरे  संग्रहित फोटो
मुंबई

विधानसभेत सगळे खोकेभाईच - राज ठाकरे

एक खोक्याभाई काय घेऊन बसलात, सगळी विधानसभाच खोक्याभाईंनी भरली आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे.

Swapnil S

मुंबई : एक खोक्याभाई काय घेऊन बसलात, सगळी विधानसभाच खोक्याभाईंनी भरली आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे. विधानसभेत सगळे खोकेभाईच भरले आहेत, असा टोला त्यांनी मुंबईत पार पडलेल्या मनसेच्या पदाधिकारी बैठकीत लगावला.

राज ठाकरे म्हणाले की, बैठकीत नियुक्त करण्यात आलेल्या नवीन समितीमुळे, तिच्या रचनेमुळे मतांमध्ये परिवर्तन होणार का, राजकारणाचा अभ्यास कमी असल्यामुळे तुम्हाला असे प्रश्न पडतात. गुढीपाडव्याच्या दिवशी मला जे बोलायचे ते मी बोलेन, असेही ते म्हणाले.

संदीप देशपांडे यांनी नव्या जबाबदारीवर भाष्य करताना सांगितले की, मोठी जबाबदारी, मोठा विश्वास राज यांनी दाखवला आहे. मनसे मिशन मुंबई महानगरपालिका सुरू झाले आहे. मनसे पालिका जोमात लढेल. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आमचे आता प्रयत्न असतील,असे देशपांडे म्हणाले.

Mumbai : मुंबई पोलिसांची फटाक्यांवर कडक नियमावली; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

पेंग्विनची भुरळ कायम! राणीच्या बागेला तीन वर्षांत ३५.३६ कोटींचा महसूल

भटक्या श्वान-मांजरींसाठी १२ कोटींचा खर्च अपेक्षित; नसबंदी, रेबीज लसीकरण मोहीम राबविणार

दिवाळी हंगामात विमान भाडे ३०० टक्क्यांनी वाढले

देशातील न्यायालयात आठ लाख अंमलबजावणी आदेश प्रलंबित; सर्वोच्च न्यायालयाची माहिती