मुंबई

धान-भरड धान्य खरेदीसाठी अंतिम मुदतवाढ; ऑनलाइन पोर्टलवर १५ जानेवारीपर्यंत नोंदणी करण्यास मुभा

शासकीय खरेदी केंद्रावर धान/ भरड धान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी ३१ डिसेंबरची मुदत होती.

Swapnil S

मुंबई : शासकीय खरेदी केंद्रावर धान/ भरड धान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी ३१ डिसेंबरची मुदत होती. मात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहू नये यासाठी धान-भरड धान्य खरेदी नोंदणीसाठी १५ जानेवारी ही अखेरची मुदतवाढ देण्यात आल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

खरीप पणन हंगाम २०२४-२५ मध्ये शेतकरी नोंदणी करता ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत अंतिम मुदत होती. मात्र अनेक भागातील शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने शासनाने नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अर्थ व नियोजन विभागाचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, माजी मंत्री व ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार, आ. राजू मोरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानुसार शेतकरी नोंदणीची मुदत १४ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, ही मुदतवाढ अंतिम असून विहित मुदतीत शेतकऱ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

दक्षिण मुंबईला मिळणार पहिले आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्र; मुंबई पोर्टकडून DPR साठी तांत्रिक सल्लागारांची मागणी

राज्य सरकारची भूमिका मोदींच्या मतांहून वेगळी का? POP गणेशमूर्तींबाबत हायकोर्टाचा सवाल

कोकणात ऑरेंज अलर्ट, वादळी वाऱ्यांचा इशारा; घाटमाथा, विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज

पोलिसी लाठीमाराचे समर्थन होऊ शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai : वाहतूककोंडीवर भूमिगत बोगद्यांचा उतारा; सहा महिन्यांत आराखडा; ४ ते ५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित