मीरा-भाईंदर महापालिकेत बनावट दुरुस्ती बांधकाम परवानगी घोटाळा; बार, लॉजिंग आणि डान्सबारच्या बेकायदा बांधकामांत गैरप्रकार (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

मीरा-भाईंदर महापालिकेत बनावट दुरुस्ती बांधकाम परवानगी घोटाळा; बार, लॉजिंग आणि डान्सबारच्या बेकायदा बांधकामांत गैरप्रकार

नेहमीच लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे चर्चेत असलेल्या मीरा-भाईंदर महानगरपालिकामध्ये आता कथित बनावट दुरुस्ती बांधकाम परवानगी प्रकरण उघडकीस आले आहे.

Swapnil S

भाईंंदर : नेहमीच लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे चर्चेत असलेल्या मीरा-भाईंदर महानगरपालिकामध्ये आता कथित बनावट दुरुस्ती बांधकाम परवानगी प्रकरण उघडकीस आले आहे. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ अंतर्गत काशिमीरा येथील जनता डेअरी कंपाउंडमधील एका गाळ्याच्या नावावर देण्यात आलेल्या कथित बनावट दुरुस्ती परवानगीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रभाग अधिकाऱ्यांनी केली आहे. यापूर्वीही कांदळवन आणि मुंबई-अहमदाबाद महामार्ग लगत दुरुस्ती परवानगीच्या नावाखाली तीन मजली इमारती उभारल्याचे प्रकार समोर आले होते. त्याप्रकरणी एका तत्कालीन पालिका अधिकाऱ्यावर २७ विभागीय चौकशा सुरू करण्यात आल्या आहेत.

महापालिकेचे प्रभाग ६ चे सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी भरत सोनारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मार्च २०२६ रोजी एका तक्रारदाराने बनावट दुरुस्ती परवानगीबाबत तक्रार दाखल केली होती. अंतर्गत तपासणीत संबंधित परवानगीची कोणतीही अधिकृत नोंद किंवा जावक क्रमांक कार्यालयाच्या नोंदवहीत आढळून आला नाही. हे प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर, भरत सोनारे यांनी ५ मे रोजी तत्कालीन सहाय्यक आयुक्त प्रियंका भोसले यांना पत्र पाठवून माहिती दिली. संबंधित बनावट पत्रावर त्यांच्या कार्यकाळातील तारीख असल्याने त्यांनी स्पष्टीकरण देताना स्वाक्षरी बनावट असल्याचे स्पष्ट केले आणि आपण अशी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका भोसले यांनी याप्रकरणी काशिमिीरा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. संबंधित गाळाधारकाने या कथित बनावट परवानगीच्या आधारे अनधिकृत बांधकाम उभारून न्यायालयातून स्थगिती आदेश (स्टे ऑर्डर) देखील मिळवला आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू असून तपास अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. महापालिकेत दुरुस्ती परवानगीबाबत कोणतेही स्पष्ट धोरण किंवा कायदेशीर तरतूद नसतानाही, शहरात दुरुस्तीच्या नावाखाली शेकडो अनधिकृत बांधकामे उभी राहिल्याचा आरोप आहे. त्यामध्ये बार, लॉजिंग आणि डान्सबार यांसारख्या व्यावसायिक बांधकामांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशीमिरा पोलीस ठाणे

Mumbai : कुर्ल्यात पहाटे मोठी दुर्घटना! क्रेनचा भाग झोपड्यांवर कोसळला; ३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी, VIDEO

Mumbai : रेल्वे स्थानकावरील एस्केलेटर दोन मिनिटांत सुरू होणार; पश्चिम रेल्वेच्या नवीन व्यवस्थेमुळे खंडित वेळ होणार कमी

७०२ कोटींचा प्रस्ताव मंजूर; सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते वरळी प्रॉमेनेड जोडणाऱ्या पादचारी पुलाचा मार्ग मोकळा

Navi Mumbai : उरणला साथीच्या आजारांचा विळखा; रुग्णालयांत रुग्णांची गर्दी

ST सहकारी बँकेत ३४ कोटींचा गैरव्यवहार? खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी