मुंबई

बाप्पाच्या विसर्जनापूर्वी खड्डे बुजवा; भाजपचे पालिका आयुक्तांना निवेदन

बाप्पाचे आगमन एका दिवसावर आले असून बाप्पाचे आगमन खड्ड्यातून होणार आहे

प्रतिनिधी

बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी गणेशोत्सव मंडळ व घराघरात सुरू आहे. मात्र विघ्नहर्त्याला खड्ड्यांचे विघ्न असून बाप्पाच्या विसर्जनापूर्वी खड्डे बुजवा, असे निवेदन पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांना दिल्याचे भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण होते. खड्डे बुजवण्यासाठी दरवर्षी मुंबई महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते; मात्र मुंबईतील खड्डे आजही सुस्थितीत आहेत. बाप्पाचे आगमन एका दिवसावर आले असून बाप्पाचे आगमन खड्ड्यातून होणार आहे; मात्र बाप्पाचे विसर्जन खड्डेमुक्त रस्त्यातून होणे अपेक्षित आहे. भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकांनी मुंबई शहर व दोन्ही उपनगरांतील खड्ड्यांची पाहणी केली; मात्र शहर व दोन्ही उपनगरातील खड्डे बुजवण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बाप्पाचे विसर्जन ९ सप्टेंबर रोजी असून त्यापूर्वी खड्डे बुजवा, अशी मागणी भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले.

१५ जानेवारीला मतदानासाठी सुट्टी, सवलत नाही? 'या' क्रमांकावर साधा संपर्क

एकीकडे नवजात बाळाचा जन्म, दुसरीकडे जवान पतीचे अंत्यदर्शन; साताऱ्यातील काळीज पिळवटून टाकणारा Video व्हायरल

भटक्या कुत्र्यांसाठी मिका सिंगची सर्वोच्च न्यायालयाला विनंती; १० एकर जमीन दान करण्याची तयारी

'लाडकी बहीण'चे पैसे निवडणुकीनंतरच द्या! काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र

'बॉर्डर २'मधील वरुण धवनच्या अभिनयावर टीका करण्यासाठी ₹५ लाखांची ऑफर; इन्फ्लुएन्सरचा दावा, कॉल रेकॉर्डिंगही केली शेअर