File Photo 
मुंबई

अखेर लोकलसेवा १६ दिवसांनी पूर्वपदावर; वेळापत्रकाप्रमाणे धावल्या लोकल: एकही लोकल रद्द नाही

मेगाब्लॉक किंवा रेल्वे रुळावरून लोकल घसरणे असो, गेल्या दोन आठवड्यापासून मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलचा खेळखंडोबा झाला होता.

Swapnil S

मुंबई : मेगाब्लॉक किंवा रेल्वे रुळावरून लोकल घसरणे असो, गेल्या दोन आठवड्यापासून मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलचा खेळखंडोबा झाला होता. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अखेर रेल्वे मंडळाने सिग्नल नियमात शिथिलता दिल्यानंतर तब्बल १६ दिवसांनी लोकल पूर्वपदावर आली. मंगळवार सकाळपासून लोकल वेळेत धावल्याने दिवसभरात एकही लोकल रद्द करावी लागली नाही. यामुळे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे नॉन-इंटरलॉकिंग आणि फलाट क्रमांक १०-११ च्या विस्तारीकरणाच्या कामासाठी मध्य रेल्वेने ३१ मे ते २ जूनपर्यंत ३६ तासांचा ब्लॉक घेतला होता. यासाठी वडाळा ते सीएसएमटी आणि भायखळा ते सीएसएमटी स्थानकादरम्यान लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. यामुळे लोकल आणि एक्स्प्रेस प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

ब्लॉकनंतर लोकल सुरळीत धावतील, अशी आशा प्रवाशांना होती. मात्र दुसऱ्याच दिवशी लोकल सेवा कोलमडली. सलग १६ दिवस लोकल सेवा ३० ते ३५ मिनिटे किंवा त्याहूनही अधिक वेळ उशिराने धावत होत्या. यामुळे प्रवाशांना लोकलसेवेचा मोठा फटका बसला होता.

लोकल सेवा सुरळीत करण्यासाठी मध्य रेल्वेने रेल्वे मंडळाला पत्र पाठवून सिग्नल नियम शिथिल करण्याची मागणी केली. रेल्वे मंडळाने शुक्रवारी नियम शिथिल केले. त्यानंतर शनिवारपासून नेहमीप्रमाणे लोकल चालवण्यास सुरुवात केली. मात्र रविवार आणि सोमवारी सुट्टीचे वेळापत्रकानुसार लोकल चालविण्यात आल्याने लोकल काही वेळ विलंबाने धावत होत्या. मात्र मंगळवारी लोकल वेळापत्रकानुसार धावत होत्या.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली